Virat Kohli Security Threat : आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना आज बुधवारी (२२ मे) अहमदाबाद येथे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे.
पण आरसीबीने या सामन्यापूर्वीचे सराव सत्र रद्द केले आहे. एका रिपोर्टनुसार विराट कोहलीला धोका आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता लक्षात घेऊन सरावासह पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यातील सामना बुधवारी संध्याकाळी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीने सराव सत्र रद्द केले. यासोबतच दोन्ही संघांनी पत्रकार परिषदही रद्द केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. ते दहशतवादी असल्याचा पोलिसांना संशय आहे. कोहलीवर धोक्याचे सावट पसरले आहे. कोहलीची सुरक्षितता लक्षात घेऊन सराव रद्द करण्यात आला.
राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील हा सामना जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल. येथे त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. IPL २०२४ चा दुसरा क्वालिफायर २४ मे रोजी खेळवला जाईल. यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल. एलिमिनेटर सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल.
आरसीबीच्या या मोसमातील कामगिरीवर नजर टाकल्यास, संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीने १४ सामने खेळले आणि ७ जिंकले. गेल्या साखळी सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. दोन सामने खेळल्यानंतर आरसीबीला सलग ६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतर त्यांनी शानदार पुनरागमन केले. राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर ते पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी १४ सामने खेळले आणि ८ जिंकले. राजस्थानला ५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता ते एलिमिनेटरमध्ये आरसीबीविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, कुलदीप सेन, कृणाल सिंग राठौर, नांद्रे बर्जर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रायन पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमी, शुब्रोन हेटमी दुबे, रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर-केडमोर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र आणि तनुष कोटियन.
आरसीबी : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद शर्मा, सिराज शर्मा , राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, लकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.