मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs RR Eliminator : ये मॅच नहीं आसाँ… एलिमिनेटर सामन्यात राजस्थान-आरसीबी भिडणार , या खेळाडूंवर असेल नजर

RCB vs RR Eliminator : ये मॅच नहीं आसाँ… एलिमिनेटर सामन्यात राजस्थान-आरसीबी भिडणार , या खेळाडूंवर असेल नजर

May 22, 2024 10:08 AM IST

IPL 2024, RCB vs RR Eliminator : आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी (२२ मे) एलिमिनेटर सामना रंगणार आहे. यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील.

RCB vs RR Eliminator : ये मॅच नहीं आसाँ… एलिमिनेटर सामन्यात राजस्थान-आरसीबी भिडणार , या खेळाडूंवर असेल नजर
RCB vs RR Eliminator : ये मॅच नहीं आसाँ… एलिमिनेटर सामन्यात राजस्थान-आरसीबी भिडणार , या खेळाडूंवर असेल नजर (AFP)

आयपीएल २०२४ मध्ये बुधवारी (२२ मे) एलिमिनेटर सामना रंगणार आहे. यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील, तेव्हा दोघांनाही विजेतेपदाच्या शर्यतीत टिकून राहण्याची ही शेवटची संधी असेल. या सामन्यातील पराभूत संघाचा प्रवास येथेच संपेल, तर विजयी संघ क्वालिफायर-२ मध्ये सनरायझर्य हैदराबादला भिडेल.

ट्रेंडिंग न्यूज

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सला आत्मविश्वासाने भरलेल्या आरसीबीचा सामना करावा लागणार आहे. आरसीबी चमत्कारिक कामगिरीने इथपर्यंत पोहोचला आहे. एके काळी, राजस्थान अव्वल दोनमध्ये येण्याची खात्री वाटत होती, पण सलग ४ पराभवांमुळे आणि केकेआरविरुद्धचा शेवटचा सामना पावसाने वाहून गेल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले. दुसरीकडे, आरसीबी प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर असताना सनसनाटी चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

पहिल्या ८ पैकी ७ सामने गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या संघाने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सलग ६ विजयांची नोंद करून आरसीबीने प्रतिस्पर्ध्यासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.

संजूसह या खेळाडूंना चमत्कार करावा लागेल

२००८ मधील आयपीएलच्या पहिल्या सत्रातील चॅम्पियन राजस्थान रॉयल्सला काही आठवड्यांपूर्वी ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु गेल्या ४ सामन्यांमध्ये त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील कमकुवतपणा उघड झाला आहे. जोस बटलर इंग्लंडला परतल्याने त्यांच्या फलंदाजीवर परिणाम झाला आहे. आता यशस्वी जैस्वाल (३४८ धावा), कर्णधार सॅमसन (५०४ धावा) आणि रियान पराग (५३१ धावा) यांच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पडतील.

सॅमसन आणि पराग यांच्याशिवाय इंग्लंडच्या टॉम हॉलर कॅडमोरकडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा आहे, जो जयस्वालसह डावाची सुरुवात करू शकतो.

शिमरॉन हेटमायर खालच्या क्रमाला बळकट करू शकतो. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे इतर मैदानांप्रमाणे फलंदाजांसाठी नंदनवन नाही, त्यामुळे रॉयल्सचे गोलंदाज येथे उपयुक्त ठरू शकतात. या मैदानावर, या मोसमात १२ डावांमध्ये केवळ दोनदा धावसंख्या २०० धावसंख्या ओलांडली आहे, याचा अर्थ शिस्तबद्ध गोलंदाजी असलेला संघ येथे बाजी मारू शकतो.

राजस्थानकडे ट्रेंट बोल्ट, आवेश खान आणि संदीप शर्मा हे त्रिकूट आहे, ज्यांनी आतापर्यंत आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. संदीप डेथ ओव्हर्समध्ये खूप प्रभावी आहे, पण गेल्या दोन सामन्यांमध्ये तो छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. फिरकीमध्ये युझवेंद्र चहल आणि अश्विन आहेत.

आरसीबीच्या या खेळाडूंवर असेल नजर

दुसरीकडे, आरसीबीच्या विराट कोहलीने या मोसमात १४ सामन्यांत ७०८ धावा केल्या असून तो ट्रम्पकार्ड ठरू शकतो. कर्णधार फाफ डु प्लेसिसही फॉर्ममध्ये परतला आहे तर रजत पाटीदारनेही ५ अर्धशतके झळकावली आहेत. इंग्लंडच्या विल जॅक्सच्या जाण्याने आरसीबीवर परिणाम झाला नाही कारण दिनेश कार्तिक खालच्या क्रमवारीत १९५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करत आहे.

शेवटच्या सामन्यात यश दयालने चेन्नई सुपर किंग्जच्या महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजाविरुद्ध उत्कृष्ट शेवटची षटके टाकून संघाला विजय मिळवून दिला. त्याला ही लय कायम ठेवायला आवडेल

दोन्ही संघ:

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, कुलदीप सेन, कृणाल सिंग राठौर, नांद्रे बर्जर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रायन पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमी, शुब्रोन हेटमी दुबे, रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर-केडमोर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र आणि तनुष कोटियन.

आरसीबी : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद शर्मा, सिराज शर्मा , राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, लकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

टी-२० वर्ल्डकप २०२४