इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४ विकेट्स राखून पराभव केला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ या विजयासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला आहे. आता त्यांचा सामना २४ मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
एलिमिनेटरमध्ये प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ८ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले.
राजस्थान संघाकडून यशस्वी जैस्वालने ३० चेंडूत ४५ धावांची शानदार खेळी केली. पण एकवेळ राजस्थानच्या ८६ धावांवर ३ पडल्या होत्या. यानंतर ११२ धावांवर चौथी विकेट गेली. त्यानंतर दबावाखाली दिसणाऱ्या राजस्थानला रियान परागने वाचवले. परागने २६ चेंडूत ३६ धावा केल्या.
शेवटी, शिमरॉन हेटमायरने १३ चेंडूत २६ धावांची खेळी केली आणि रोव्हमन पॉवेलने ८ चेंडूत १६ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने २ बळी घेतले.
आरसीबीकडून कोहलीने २४ चेंडूत ३३ धावा केल्या. महिपाल लोमररने १७ चेंडूत ३४ धावा करून रजत पाटीदारला बाद केले. ग्रीन २७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीकडून गोलंदाजी करताना सिराजने २ बळी घेतले. फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
राजस्थानची चौथी विकेट पडली. ध्रुव जुरेल धावबाद झाला. विराट कोहलीने सीममारेषेजवळून रॉकेट वेगाने थ्रो फेकला. यानंतर चेंडू ग्रीनने कोणतीही चूक न त्याला धावबाद केले
राजस्थानने १३.१ षटकात ४ गडी गमावून ११२ धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सची तिसरी विकेट पडली. संजू सॅमसन १३ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. त्याने १ षटकार मारला. कर्ण शर्माने सॅमसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
राजस्थानने १० षटकांत ३ गडी गमावून ८६ धावा केल्या.
आरसीबीकडून लॉकी फर्ग्युसनला पहिली विकेट मिळाली. त्याने कॅडमोरला क्लीन बोल्ड केले. कॅडमोर १५ चेंडूत २० धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार मारले.
राजस्थानने ५.३ षटकात १ गडी गमावून ४६ धावा केल्या आहेत.
एलिमिनेटर सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १७२ धावा केल्या आहेत. राजस्थानला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य आहे.
आरसीबीकडून रजत पाटीदारने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर विराट कोहलीने ३३ आणि महिपाल लोमरने ३२ धावा केल्या.
कोहलीने २४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारला. कॅमेरून ग्रीनने २७ धावांची खेळी केली. रजत पाटीदारने २२ चेंडूत ३४ धावा केल्या. दिनेश कार्तिक ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्वप्नील सिंग ९ धावा करून नाबाद राहिला.
राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याचवेळी अश्विनला दोन विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
आरसीबीने १६ षटकांत ५ गडी गमावून १३४ धावा केल्या आहेत. महिपाल लोमर ७ चेंडूत १५ धावा करून खेळत आहे. त्याने २ षटकार मारले आहेत. दिनेश कार्तिक ४ धावा करून खेळत आहे. आता आरसीबीच्या डावात ४ षटके शिल्लक आहेत.
आरसीबीने १४ षटकांत ४ गडी गमावून ११६ धावा केल्या. रजत पाटीदार २० चेंडूत २८ धावा करून खेळत आहे. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. महिपाल लोमरोर ७ धावा करून खेळत आहे.
आरसीबीची चौथी विकेट पडली. ग्लेन मॅक्सवेल शुन्यावर बाद झाला. अश्विनने त्याला बाद झेलबाद केले. आरसीबी बॅकफूटवर आहे. संघाने १३ षटकांत ४ गडी गमावून ९७ धावा केल्या. रजत पाटीदार १६ धावा करून खेळत आहे. महिपाल लोमरर यांना अद्याप खाते उघडता आलेले नाही.
आरसीबीची तिसरी विकेट पडली. कॅमेरून ग्रीन २१ चेंडूत २७ धावा करून झेलबाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. ग्रीनला अश्विनने बाद केले.
आरसीबीने १२.३ षटकात ३ गडी गमावून ९७ धावा केल्या आहेत.
आवेश खानने १२व्या षटकात १४ धावा दिल्या. या षटकात रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी १ चौकार लगावला. आरसीबीने १२ षटकांत २ गडी गमावून ९५ धावा केल्या आहेत. ग्रीनने 26 तर पाटीदारने १५ धावा केल्या आहेत.
आठव्या षटकात ५६ धावांवर बेंगळुरूला दुसरा धक्का बसला. कर्णधार फाफ डुप्लेसिसनंतर विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. डुप्लेसिसला रोवमनच्या हाती बोल्टने झेलबाद केले. त्याला १७ धावा करता आल्या. तर कोहली २४ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने ३ चौकार आणि एक षटकार लगावला. चहलने त्याला डोनोवन फरेराकरवी झेलबाद केले. सध्या कॅमेरून ग्रीन आणि रजत पाटीदार क्रीजवर आहेत.
शेवटी ट्रेंट बोल्टने करून दाखवले. पहिल्या षटकापासून तो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला पाचव्या षटकात यश आले. बोल्टने राजस्थानला मोठी विकेट घेतली. फाफ डू प्लेसिस १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो झेलबाद झाला. रोव्हमन पॉवेलने त्याचा अप्रतिम झेल घेतला. कॅमेरून ग्रीन फलंदाजीला आला आहे.
आरसीबीने ५ षटकात १ गडी गमावून ३७ धावा केल्या आहेत.
आरसीबीचे फलंदाज फॉर्ममध्ये दिसत आहेत. कोहली आणि डु प्लेसिसने संधी मिळताच चौकार ठोकले. राजस्थानने दुसरे षटक संदीप शर्माकडे सोपवले. संदीपने पहिले दोन चेंडू चांगलेच टाकले. पण पुढच्याच चेंडूवर कोहलीने चौकार ठोकला. डु प्लेसिसने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.
इम्पॅक्ट सब: स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाक, हिमांशू शर्मा.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट सब: नांद्रे बर्गर, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, तनुष कोटियन, शिमरॉन हेटमायर.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिमरॉन हेटमायर राजस्थान संघात परतला आहे. त्याच वेळी, बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी RCBने १५ जिंकले तर राजस्थानने १३ जिंकले. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. एक सामना रद्द झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. येथे आरसीबी आणि आरआर या दोघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे.
RCB आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील IPL २०२४ चा एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अहमदाबादची खेळपट्टी सामान्यत: फलंदाजांसाठी अनुकूल असते. त्याचबरोबर या खेळपट्टीवर गोलंदाजांनाही मदत मिळते. येथे खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यांमध्ये संथ खेळपट्टी दिसली आहे.
चालू आयपीएल हंगामात या मैदानावर एकूण ७ सामने खेळले गेले, त्यापैकी एक सामना पावसामुळे वाहून गेला, तर या मैदानावर दोनदा २०० हून अधिक धावा झाल्या. त्याचवेळी याच मैदानावर गुजरात टायटन्सचा संघ ८९ धावांत ऑलआऊट झाला होता, त्यामुळे या खेळपट्टीवर अत्यंत सावधपणे खेळण्याची गरज आहे.