चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निवड केली आहे. धोनीने दुबई आय १०३.८ या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, मेटाचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याला प्रचंड आवडते. धोनीच्या मते, इन्टाग्राम हे इलॉन मस्कच्या एक्स प्लॅटफॉर्मपेक्षा उत्तम आहे.
वास्तविक, धोनी म्हणाला, की तो इंस्टाग्रामवर लो-प्रोफाइल मेंटेन करतो. जेव्हा जेव्हा त्याला त्याच्या चाहत्यांसोबत काही अपडेट्स शेअर करायचे असतात तेव्हा तो इन्स्टाग्रामवर सक्रीय होतो.
मस्कच्या एक्स प्लॅटफॉर्मबाबत धोनीने सांगितले, की मायक्रोब्लॉगिंग साइटमुळे भारतात अनेक वाद निर्माण होतात. धोनी त्याच्या विधानात म्हणतो, “मी ट्विटरपेक्षा इंस्टाग्रामला प्राधान्य देतो, म्हणजेच मला X (पूर्वीचे ट्विटर) पेक्षा इंस्टाग्राम अधिक आवडते.
धोनी म्हणतो की X वर कधी काही चांगलेले घडले नाही. भारतात तर त्यावर नेहमी वादच रंगलेले असतात. त्या प्लॅटफॉर्मवर कोणी काहीही लिहिलं तर लगेच नवा वाद निर्माण होतो.
धोनी पुढे म्हणाला, कल्पना करा की मी तिथे काहीतरी पोस्ट केले आहे, आणि ते वाचण्यासाठी लोकांवर सोडले आहे, पण लोक येतात आणि त्यांच्या समजुतीनुसार जो काय अर्थ लावायचा तो लावतात. अर्थाचा अनर्थ अधिक होतो.
इन्स्टाग्रामवरही जास्त सक्रिय राहायला आवडत नाही
त्याच्या सोशल मीडियाच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना धोनी म्हणतो की त्याला इन्स्टाग्रामवरही लो प्रोफाइल ठेवायला आवडते.
धोनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटबद्दल सांगायचे तर, ४८.१ मिलियन्स लोक त्याला या प्लॅटफॉर्मवर फॉलो करतात. तो फक्त ४ लोकांना फॉलो करतो. त्याचवेळी धोनीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून आतापर्यंत एकूण १०९ पोस्ट शेअर केल्या आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तो चालू आयपीएल हंगामात मूठभर चेंडू शिल्लक असताना फलंदाजीसाठी उतरला. धोनीने यंदा १४ सामन्यांत ५३.६७ च्या सरासरीने आणि २२०.५५ च्या स्ट्राईक रेटने १६१ धावा केल्या.
संबंधित बातम्या