भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) सहाय्यक कमांडंट पदांच्या ७० जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. भरती प्रक्रिया आज, १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार joinindiancoastguard.cdac.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे.
जनरल ड्युटी (GD): ५० जागा
टेक्निकल (Engg/ Elect): २० जागा
पात्रतेचे निकष:
जनरल ड्युटी (GD) या पदांसाठी उमेदवार किमान ६० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पास झालेला असावा.
टेक्निकल (मेकॅनिकल) या श्रेणीतील पदांसाठी उमेदवाराने नेव्हल आर्किटेक्चर (Naval Architecture) किंवा मेकॅनिकल (Mechanical) किंवा मरीन (Marine) किंवा ऑटोमोटिव्ह (Automotive) किंवा मेकॅट्रॉनिक्स (Mechatronics) किंवा इंडस्ट्रियल अँड प्रॉडक्शन (Industrial and Production) किंवा मेटलर्जी (Metallurgy) किंवा डिझाइन (Design) किंवा एरोनॉटिकल (Aeronautical) किंवा एरोस्पेसमध्ये (Aerospace) या विषयांमधून किमान ६० टक्के एकूण गुणांसह अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) साठी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनीअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये किमान ६० टक्के गुणांसह इंजिनीअरिंग पदवी आवश्यक आहे.
उमेदवाराचे वय १ जुलै २०२४ रोजी २१-२५ वर्षे दरम्यान असावे.
अर्ज शुल्क
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३०० रुपये आहे. जे नेट बँकिंग किंवा व्हिसा / मास्टर / मेस्ट्रो / रुपे / क्रेडिट / डेबिट कार्ड / यूपीआय वापरुन ऑनलाइन भरता येईल.
एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या