मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Police : महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी; दिल्लीतील पीएसआयची चौकशी सुरू

Delhi Police : महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी; दिल्लीतील पीएसआयची चौकशी सुरू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 12, 2022 11:49 AM IST

Sexual Harassment Case : आरोपी पोलीस अधिकारी दारू पिऊन महिला कर्मचाऱ्याला सेक्सची मागणी करायचा. इतकंच नाही तर महागडे गिफ्टही मागायचा. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Sexual Harassment Case In Delhi
Sexual Harassment Case In Delhi (HT)

Sexual Harassment Case In Delhi : महिला पोलीस कर्मचाऱ्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करून तिला शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतून समोर आली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणात आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्लीतील फतेहपुर बेरीतील पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपुर बेरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षण गेल्या अनेक दिवसांपासून याच पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका महिला पोलिसाला शरीरसुखाची मागणी करत होता. अनेकदा त्यांना दारू पिऊन ठाण्यात महिलांना शिवीगाळ केलेली होती. याशिवाय त्यानं पीडित महिलेवर वर्णद्वेषी टिप्पणीही केली होती. त्यानंतर आता पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाण्यात शिफ्ट करून देण्यासाठी पोलीस निरिक्षक महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी करत होता. याशिवाय पीडितेला आरोपीनं पैसे आणि महागड्या गिफ्टचीही मागणी केली होती, असं पीडित महिला पोलिसानं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

वरिष्ठांनी प्रकरणाला गांभीर्यानं घेत दिले चौकशीचे आदेश...

महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पीएसआयवर केलेल्या आरोपानंतर आता दिल्लीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात आरोपी पीएसआयला अटक होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग