मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Illegal Toll: महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर खडसेंचं आंदोलन; अवैध टोलवसुलीविरोधात कारवाईची मागणी

Illegal Toll: महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर खडसेंचं आंदोलन; अवैध टोलवसुलीविरोधात कारवाईची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 12, 2022 08:31 AM IST

Eknath Khadse Protest : टोलनाक्यावरील अवैध टोल वसूलीविरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी थेट महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर आंदोलन केलं आहे.

Protest Against Illegal Toll On Maharashtra And Madhya Pradesh Border
Protest Against Illegal Toll On Maharashtra And Madhya Pradesh Border (HT)

Protest Against Illegal Toll On Maharashtra And Madhya Pradesh Border : अवैध टोलवसूलीविरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर आंदोलन केलं आहे. खडसेंनी दोन्ही राज्यांच्या चेकपोस्टवर आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राज्यांच्या सीमेवर अवैधरित्या टोलवसूली होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर खडसेंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेश बॉर्डरवर अवैध टोलवसूलीचा सामना करावा लागत होता. परंतु या प्रकरणाची तक्रार कुणाकडे करायची?, असा प्रश्न नागरिकांना पडत होता. परंतु अखेर एकनाथ खडसे यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ खडसे हे आंदोलनस्थळी पोहचताच त्यांनी हा प्रकार कुणाच्या आशिर्वादानं सुरू आहे, असा प्रश्न पोलिसांना विचारला. त्यावेळी पोलिसांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांनी तिथं तब्बल तीन तास आंदोलन केलं. सीमेवरील टोलनाक्यावरून ओव्हरलोड ट्रक जात असेल तर पोलीस २५ ते ३० हजारांपर्यंतची रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर खडसेंनी पोलिसांनाच धारेवर धरलं.

चेकपोस्टवरही होतेय वाहनधारकांची लूट...

महाराष्ट्र-मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांना जोडणाऱ्या चेकपोस्टवरील वजनकाटे नादुरुस्त असून तेथील लोक वाहनचालकांकडून बेकायदेशीररित्या अधिकचे पैसे आकारत असल्याचा आरोप खडसेंनी केला. दरम्यान एकनाथ खडसेंनी सीमेवरील टोलनाका आणि चेकपोस्टवरील अवैध धंद्यांविरोधात आंदोलन सुरू करताच तेथील काही आरोपींनी पळ काढला. त्यानंतर आता या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे.

IPL_Entry_Point