मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhagirath Biyani: भाजपच्या शहराध्यक्षाची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Bhagirath Biyani
Bhagirath Biyani

Bhagirath Biyani: भाजपच्या शहराध्यक्षाची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

11 October 2022, 14:39 ISTAtik Sikandar Shaikh

Bhagirath Biyani Suicide In Beed : भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजताच खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात धाव घेतली.

BJP Leader Bhagirath Biyani Suicide In Beed : भारतीय जनता पक्षाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेची माहिती समजताच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. आज सकाळी ही घटना घडली असून त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. ही घटना त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी बियाणी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयात कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भाजप खासदार प्रीतम मुंडे या देखील दाखल झाल्या आहेत.

आत्महत्या की घातपात?, पोलीस तपास सुरू...

भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अजून समोर आलेलं नाही. परंतु आता बीड पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. त्यानंतर आता त्यांनी आत्महत्या केली आहे की या घटनेमागे घातपात आहे, याची चौकशी केली जात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच परभणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता बीडच्या भाजप अध्यक्षांनी स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. भगीरथ बियाणी हे भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. आता त्यांनी आत्महत्या केल्यानं भाजपमध्ये शोककळा पसरली आहे.