मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan Crisis : पाकमध्ये महागाईने जनता बेहाल.. चहा १६०० रुपये किलो तर चिकनची दर ऐकून डोळे फिरतील!

Pakistan Crisis : पाकमध्ये महागाईने जनता बेहाल.. चहा १६०० रुपये किलो तर चिकनची दर ऐकून डोळे फिरतील!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 13, 2023 12:46 AM IST

Inflation in Pakistan : कराचीमध्ये कोंबडीची किंमत ४९० हून अधिक झाली आहे. तर कोंबडीच्या मांसाची किंमत ७२० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

Inflation in Pakistan
Inflation in Pakistan

पाकिस्तान कर्जाच्या खाईत आकंठ बुडालेला असून वाढत्या महागाईने सामान्य लोकांचे जगणे मुश्किल बनले आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानमधील महागाई भीषण रुप घेत आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, कराची शहरासह पाकिस्तानमध्ये  चिकन व मांसाच्या किंमतीने नवा उच्चांक स्थापित केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कराचीमध्ये कोंबडीची किंमत ४९० हून अधिक झाली आहे. तर कोंबडीच्या मांसाची किंमत ७२० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. कोंबड्यांच्या कमतरतेमुळे देशातील अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे चिकन व अंड्याचे दर गगनाला भिडले आहेत. 

रावळपिंडी, इस्लामाबाद आणि अन्य शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. इतर काही शहरांमध्ये कोंबडीची किंमतही सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या लाहोरमध्ये चिकनचे दर साडे पाचशे ते ६०० रुपये झाले आहेत. विशेष म्हणजे, चिकन हे पाकिस्तानातील मुख्य अन्नांपैकी एक आहे.

पाकिस्तानात गेल्या १५ दिवसांत चहाची किंमत १ हजार १०० रुपयांवरून १,६०० रुपये प्रति किलो झाली आहे. चहा उत्पादक एका  ब्रँडची १७० ग्रॅम दाणेदार आणि वेलची पॅकची किंमत २९० रुपयांवरून साडेतीनशे रुपये वाढले आहेत. 

IPL_Entry_Point

विभाग