मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Turkey Earthquake : चमत्कार.. १२८ तास ढिगाऱ्याखाली अडकलेला २ महिन्याचा चिमुकला बचावला

Turkey Earthquake : चमत्कार.. १२८ तास ढिगाऱ्याखाली अडकलेला २ महिन्याचा चिमुकला बचावला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 12, 2023 09:25 PM IST

earthquakes in turkey : तुर्कीमधील विनाशकारी भूकंपानंतर पाच दिवसांनी ढिगाऱ्याखालून २ महिन्याचा चिमुकला, ६ महिन्याची गर्भवती महिला व ७० वर्षीय वृद्ध महिलेला सुखरुप बाहेर काढले आहे.

Turkey Earthquake
Turkey Earthquake

Turkey Syria Earthquake : सीरिया आणि तुर्कीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर २८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ६हजाराहून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. दरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदत व बचावकार्य सुरू आहे. तुर्की आणि सीरियामधील भूकंपाचे फोटो पाहून मन गहिवरून येते. अशा नैसर्गिक आपत्तीत अनेक चमत्कारही होताना दिसून आले.रविवारीदो महिन्याच्या एका मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून मुलाचे स्वागत केले.

भूकंप झाल्यानंतर १२८ तासांनंतर म्हणजे जवळपास ६ दिवसांनंतर एक मुलगा ढिगाऱ्याखालून जिंवत बाहेर आला आहे. भूकंपानंतर येथे प्रतिकूल हवामानाचा फटका बसला. कडाक्याच्या थंडीमुळे मदत व बचावकार्यात अडचणी येत आहे. सीरिया आणि तुर्कीमधील भीषण परिस्थिती पाहून भारतासह अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भूकंपाच्या पाच दिवसानंतर ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये दोन महिन्याचा चिमुकला, ६ महिन्यांची गर्भवती महिला व ७० वर्षीय महिला सामील आहे.

 

सोमवारी तुर्कीच्या सीमावर्ती परिसरात ७.८ तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यानंतर पाच दिवसात जवळपास १०० हून अधिक छोटे-मोठे धक्के जाणवले आहेत. याला आपत्तीला जगातील सातवी सर्वात धोकादायक आपत्तीच्या रुपात पाहिले जात आहे. यापूर्वी इराणमध्ये २००३ मध्ये झालेल्या भूकंपात ३१ हजार लोक मारले गेले होते. तुर्कीमध्ये १९३९ नंतरचा हा सर्वात भयंकर भूकंप होता. त्या भूकंपात ३५ हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

IPL_Entry_Point