मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाने सोडली काँग्रेसची साथ, हातात धरले ‘कमळ’

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाने सोडली काँग्रेसची साथ, हातात धरले ‘कमळ’

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 14, 2024 03:14 PM IST

lal bahadur shastri grandson resigns from congress : माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे की, माननीय काँग्रेस अध्यक्ष खर्गेजी मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.

 vibhakar shastri  left  congress  and  joined bjp
vibhakar shastri  left  congress  and  joined bjp

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यात सर्वात जास्त इनकमिंग भाजपमध्ये होत असून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाचे साथ सोडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्या रुपात काँग्रेसला मोठा धक्का बसला असतानाच आता उत्तरप्रदेशमध्येही काँग्रेसचा तगडा धक्का बसला आहे. देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विभाकर शास्त्री यांचा राजीनामा काँग्रेसच्या पक्ष संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अनेक बडे नेते पक्ष सोडून जात असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. विभाकर शास्त्री यांनी सोशल मीडियावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून ट्विट करत विभाकर शास्त्री यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचं सदस्यत्व सोडल्यानंतर विभाकर यांनीउत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रृजेश पाठक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

 

विभाकर शास्त्रीयांनी काँग्रेस सोडल्यानंतर म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मी लाल बहादुर शास्त्री यांच्या 'जय जवान,जय किसान' दृष्टिकोणास आणखी मजबूत करून देशाची सेवा करू शकेन. माझ्यासाठी भाजपचे दरवाजे खोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मादी, जेपी नड्डा, गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ब्रजेश पाठक यांचे आभार मानतो. इंडिया आघाडीकडे कोणतीही विचारसरणी नाही. त्यांचा उद्देश्य केवळ पंतप्रधान मोदींना हटवणे इतकाच आहे. राहुल गांधींना सांगितले पाहिजे की, काँग्रेसची विचारसरणी काय आहे.

IPL_Entry_Point

विभाग