मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Yediyurappa booked: अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध गुन्हा

Yediyurappa booked: अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध गुन्हा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 15, 2024 10:46 AM IST

B S Yediyurappa Booked Under POCSO: १७ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BS Yediyurappa
BS Yediyurappa

BS Yediyurappa News: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर येडियुरप्पांच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्याच्यावर १७ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी येडियुरप्पा यांच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याशिवाय, आयपीसी कलम ३५४ (अ) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला. लैंगिक अत्याचाराची कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.

महिलेच्या मुलीवर काही जणांनी बलात्कार केला होता. मात्र, पोलिसात कोणतीही सुनावणी झाली नाही. यासाठी तिने बीएस येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागितली. परंतु, येडियुरप्पा यांनी मदतीच्या नावाखाली तिच्या मुलीचे लैंगिक शोषण केले असा आरोप करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, 'ज्यावेळी संबंधित महिला आपल्या पीडित मुलीसह येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेली असता त्यांनी पीडिताला एका खोलीत नेले. त्यानंतर खोलीचा दरवाजा बंद केला. जेव्हा तिची मुलगी बाहेर आली, तेव्हा तिने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. यानंतर येडियुरप्पा पीडिताच्या आईची माफी मागितली. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगू नको, असे सांगितले.' याप्रकरणी सदाशिवनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरूवात केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग