मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  YouTuber Devraj Patel: 'दिल से बुरा लगता है', फेम कॉमेडियन देवराज पटेलचा अपघाती मृत्यू

YouTuber Devraj Patel: 'दिल से बुरा लगता है', फेम कॉमेडियन देवराज पटेलचा अपघाती मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 26, 2023 10:29 PM IST

Youtuber Devraj patel dies : छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल याचा अपघाती मृत्यू झाला आहे. सीएम बघेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याच्या मृत्यूची बातमी देणारं ट्विट केलं असून एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

YouTuber Devraj Patel
YouTuber Devraj Patel

YouTuber Devraj Patel Dies : छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल याचा आज (२६ जून) रस्ते अपघातात मृत्यू झाला. मोटारसायकलस्वार देवराजला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात कॉमेडियन देवराज पटेलचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ट्रेंडिंग न्यूज

सीएम बघेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याच्या मृत्यूची बातमी देणारं ट्विट केलं असून एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये बघेल यांनी सांगितले की, देवराज दुचाकीवर मागे बसला होता व त्याचा मित्र दुचाकी चालवत होता. त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. तेव्हा मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. ट्रकची ओळख पटली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले आहे. या घटनेत देवराजचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र सुखरूप बचावला आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

देवराज पटेल हा मुळचा छत्तीसगडचा असून सोशल मीडियावर विशेषत: यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तो ओळखला जात होता. देवराजने त्याच्या व्हिडिओंसाठी "दिल से बुरा लगता है" ही पंच लाईन वापरली. देवराज पटेल याने मृत्यूच्या चार तास आधी एक व्हिडीओ बनवून पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये त्याने सर्वांना अलविदा म्हटले आहे. देवराज पटेलने २०२१ मध्ये प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम सोबत कॉमेडी वेब सिरीज धिंडोरा मध्ये काम केलं होतं.

“दिल से बुरा लगता है” त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यानंतर त्याने आपल्या युट्यूब चॅनलचे नाव देवराज पटेल हे बदलून'दिल से बुरा लगता है', हे केलं होत. देवराज याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं आहे.

काही दिवसांपूर्वी युट्युबर देवराज पटेल याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या भेटी दरम्यान एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये देवराज म्हणतो की, छत्तीसगडमध्ये फक्त दोनच लोक प्रसिद्ध आहेत, एक मी आणि एक मोर काका. यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना हसू अनावर झाले होते.

IPL_Entry_Point