Delhi school remain close because of air pollution : दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाने गंभीर रूप धारण केले आहे. दिल्लीतील प्रदूषित हवेमुळे परिस्थितीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढते प्रदूषण पाहता केजरीवाल सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तर इयत्ता ६ वि आणि १२ पर्यंतच्या शाळा या ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवल्या जाणार आहे.
दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिश यांनी रविवारी ट्विट करत या बाबत माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शहरातील प्रदूषण पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे दिल्लीतील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. तर इयत्ता ६ ते १२ च्या वर्ग हे ऑनलाइन घेतले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदूषित वातावरण आणि दूषित वारे यांच्यामुळे रविवारी सलग सहाव्या दिवशी दिल्लीत वातावरण सर्वाधिक प्रदूषित होते. दिल्लीचा हवा प्रदूषणाचा निर्देशांक (AQI) हा 'अत्यंत गंभीर' श्रेणीत पोहोचला आहे. दिल्लीत, शनिवारी दुपारी ४ वाजता AQI हा ४१५ नोंदवला गेला. तर रविवारी सकाळी ७ वाजता ४६० पर्यंत घसरले.
दिल्लीत AQI हा ४५० ओलांडल्यास, केंद्राची वायु प्रदूषण नियंत्रण योजना लागू करणे बंधनकारक आहे. यामुळे प्रदूषण करणाऱ्या ट्रक, चारचाकी व्यावसायिक आणि वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी देखील घातली जाऊ शकते.
दिल्लीत PM २.५ ची आद्रता ही जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्धारित केलेल्या पाच मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर मर्यादेच्या ८० ते १०० पट इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यापासून, तापमानात हळूहळू घट होत आहे. यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये देखील प्रदूषण वाढले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान दिल्लीचा AQI हा २०० हून अधिक गुणांनी वाढला. शुक्रवारी तर हवा सर्वाधिक प्रदूषित होती. ही 'अत्यंत गंभीर' श्रेणी असून AQI हा ४५० च्या वर पोहोचला आहे. २४ तासांची सरासरी AQI नोंद ही रोज दुपारी ४ वाजता नोंदवली जाते. शुक्रवारी दिल्लीत सरासरी २४ तास AQI हा ४६८ नोंदवण्यात आला. तर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी नोंदवलेल्या ४७१ एवढा नोंदवला होता.
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या विश्लेषणानुसार, पंजाब आणि हरियाणामध्ये १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत राजधानीत सर्वाधिक प्रदूषण होते. दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही जगात सर्वात म्हणून नोंदवण्यात आली आहे. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने (EPIC) ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की वायू प्रदूषणामुळे दिल्लीतील लोकांचे आयुष्य सुमारे १२ वर्षांनी कमी होत आहे.