s somanath : इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रावरून गदारोळ! पुस्तकाचं प्रकाशन रद्द
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  s somanath : इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रावरून गदारोळ! पुस्तकाचं प्रकाशन रद्द

s somanath : इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रावरून गदारोळ! पुस्तकाचं प्रकाशन रद्द

Nov 06, 2023 09:22 AM IST

ISRO chief Somanath withdraws publishing autobiography : इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आत्म चरित्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांनी माजी इस्रो प्रमुख के. सिवन यांच्यावर टीका केल्याचा आरोप होत आहे.

SRO chief Somanath withdraws publishing autobiography
SRO chief Somanath withdraws publishing autobiography

ISRO Chief S. Somnath Autobiography : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या आत्मचरित्रात इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्यावर टीका केल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, होणारा वाद पाहता सोमनाथ यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशन रद्द केले आहे. या संदर्भात त्यांनी केला वृत्त पत्राला माहिती दिली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार? सी व्होटरच्या सर्वेक्षणात भाजपला धक्का

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे प्रमुख एस. सोमनाथ हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. एस. सोमनाथ यांच्या कारकिर्दीत चंद्रयान ३ मोहीम ही यशस्वी झाली. या सोबतच आदित्य एल १ ही मोहीम सुद्धा यशस्वी झाली. दरम्यान, यावरून त्यांचे कौतुक होत असतांना एस. सोमनाथ यांच्यावर आता टीका होत आहे. एस. सोमनाथ यांनी ‘निलावू कुडीचा सिंहगल’ हे मल्याळम भाषेतील आत्मचरित्र लिहिले असून याचे पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते. मात्र, या आत्मचारित्रावरून गदारोळ झाल्याने त्यांनी हे प्रकाशन रद्द केले आहे.

Nashik News: निवडणूक मतदानादरम्यान नाशिकमध्ये राडा; महिला उमेदवार सदस्यांच्या पती व समर्थकांमध्ये हाणामारी

सोमनाथ यांच्या आत्मचरित्रात के. सिवन यांच्यावर टीका करण्यात आल्याचा दावा काही जणांनी केला आहे. यावरून हा वाद झाला आहे. सोमनाथ यांची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याकरता इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांनी हस्तक्षेप केला होता, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र, हे पुस्तक प्रकाशीत होण्याआधीच त्याच्या प्रती या बाहेर गेल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमनाथ यांनी हे पुस्तक प्रकाशन रद्द केले आहे.

सोमनाथ म्हणाले, जीवनातील आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हे आत्मचरित्र लिहिले आहे. हे चरित्र्य कोणावरही टीका करण्याकरता लिहिलेले नाही. मी माझ्या पुस्तकातून कुणावरही टीका केली नाही. तसेच कुणालाही टार्गेट केले नाही. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. एखाद्या संस्थेत पद मिळवण्याकरताही अनेक आव्हाने पेलावी लागतात. या ठिकाणी एका पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असू शकतात. हेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चांद्रयान २ मोहीम अयशस्वी झाल्याच्या घोषणेच्या संदर्भात स्पष्टता नव्हती असे देखील त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर