मराठी बातम्या  /  देश-विदेश  /   Kuldeep Bishnoi: काँग्रेसकडून कुलदीप बिश्नोई यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

Kuldeep Bishnoi: काँग्रेसकडून कुलदीप बिश्नोई यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 11, 2022 11:16 PM IST

हरियाणा काँग्रेसने (Haryana Congress) आमदार कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आमदार कुलदीप बिश्नोई
आमदार कुलदीप बिश्नोई

Congres sexpels Kuldeep Bishnoi : राज्यसभेसाठी चार राज्यात १६ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षादेश झुगारून क्रॉस व्होटींग झाले. राजस्थानमध्ये भाजपच्या महिला आमदाराने काँग्रेसला मत दिल्यानंतर या आमदाराला पक्षाने तात्काळ घरचा रस्ता दाखवला होता. आता हरियाणा काँग्रेसने (Haryana Congress) आमदार कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election Result 2022) क्रॉस व्होटिंगबाबत पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने बिश्नोई यांची पक्षाच्या सर्व विद्यमान पदांवरून हकालपट्टी केली आहे. पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी बिश्नोई यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यासह पक्षाच्या जबाबदाऱ्यांवरून तत्काळ प्रभावाने मुक्त केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेसकडून हरियाणा विधानसभा अध्यक्षांनाही शिफारस केली जाऊ शकते. दुसरीकडे हरियाणातून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्वीट केले आहे की, 'सापाचा फणा चिरडण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे, सापांच्या भीतीने जंगल सोडू नका. गुड मॉर्निंग.' त्यांनी एका ट्विटर युजरचे ट्विटही रिट्विट केले, ज्यात म्हटले आहे की, 'योग्य वेळी घेतलेला निर्णय एखाद्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे करतो.'

IPL_Entry_Point