मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New CJI In SC : नव्या सरन्यायाधीश पदासाठी न्या. चंद्रचूड यांची शिफारस; उदय लळीत यांचं केंद्राला पत्र

New CJI In SC : नव्या सरन्यायाधीश पदासाठी न्या. चंद्रचूड यांची शिफारस; उदय लळीत यांचं केंद्राला पत्र

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 11, 2022 02:19 PM IST

New CJI Of India : सध्याचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या. चंद्रचूड यांची केंद्राकडे शिफारस केली आहे.

cji uday lalit and justice dhananjay chandrachud
cji uday lalit and justice dhananjay chandrachud (HT)

Next CJI Of India 2022 : काही दिवसांपूर्वीच माजी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्याकडून सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता उदय लळित यांनी पुढच्या सरन्यायाधीशपदासाठी न्या. चंद्रचूड यांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. त्यामुळं केंद्रानं लळित यांची शिफारस मान्य केली तर काही महिन्यांतच सुप्रीम कोर्टाला तिसरे सरन्यायाधीश मिळतील. न्यायमूर्ती ललित हे पुढच्या महिन्यात निवृत्त होत असल्यानं त्यांनी केंद्राला पत्र लिहून उत्तराधिकाऱ्याच्या नावाची सूचना केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सर्व न्यायमूर्तींना लाउंजमध्ये बैठकीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केल्याची घोषणा केली. सध्या सर्वोच्च न्यायालयात जेष्ठतेच्या निकषानुसार लळीत यांच्यानंतर चंद्रचूड यांचा नंबर लागत असल्यानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

येत्या आठ नोव्हेंबरला लळीत यांचा कार्यकाल संपणार...

काही दिवसांपूर्वीच उदय लळित यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रं हाती घेतली होती. परंतु त्यांचं वय जास्त असल्यानं त्यांना केवळ ७४ दिवसांचा कार्यकाळ मिळणार होता. आता हा कार्यकाळ येत्या आठ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं आता चंद्रचूड सरन्यायाधीश झाले तर ते देशाचे ५० वे सरन्यायाधीश ठरतील.

चंद्रचूड यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार...

सध्याचे सरन्यायाधीश उदय लळीत यांना केवळ ७४ दिवसांचाच कार्यकाळ मिळाला आहे. परंतु आता न्या. चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदासाठी निवड झाल्यास त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. कारण ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होणार आहेत. २०१६ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये ऐतिहासिक निकाल दिलेले आहेत.

IPL_Entry_Point