मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat Election 2022 : भाजपला गुजरातमधून सर्वाधिक देणग्या; कॉंग्रेस दुसऱ्या तर आप तिसऱ्या स्थानी

Gujarat Election 2022 : भाजपला गुजरातमधून सर्वाधिक देणग्या; कॉंग्रेस दुसऱ्या तर आप तिसऱ्या स्थानी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 28, 2022 11:32 AM IST

Corporate Donations For Political Partys : गेल्या पाच वर्षांच्या काळात गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक कॉर्पोरेट फंड मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Corporate Donations For Political Partys In Gujarat Assembly Elections
Corporate Donations For Political Partys In Gujarat Assembly Elections (HT)

Corporate Donations For Political Partys In Gujarat Assembly Elections : सध्या गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुणाळी सुरू आहे. गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपनं पुन्हा विजय मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं आहे. तर कॉंग्रेस आणि नवख्या आम आदमी पक्षानंही गुजरातमध्ये विजयासाठी कंबर कसली आहे. परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक कॉर्पोरेट देणग्या मिळाल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. त्यामुळं आता भाजपकडून गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचारात सर्वाधिक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं जारी केलेल्या रिपोर्टनुसार, २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या काळात भाजपला गुजरातमध्ये तब्बल १६३.५४ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट फंड मिळाला आहे. त्यानंतर कॉंग्रेसला १०.४६ कोटी तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला ३.२ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला मिळालेल्या देणग्यांपैकी एकट्या भाजपलाच १५ पट जास्त कॉर्पोरेट फंड प्राप्त झाला आहे. गेल्या पाच वर्षांत १५१९ देणगीदारांकडून गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस, आप आणि एसकेएम या चार पक्षांना १७४.०६ कोटी रुपयांचा देणग्या देण्यात आल्या होत्या. त्यात भाजपला सर्वाधिक कॉर्पोरेट फंड मिळाला आहे.

२०१८-१९ या साली ५२४ देणगीदारांकडून भाजपला सर्वाधिक ४६.२२ कोटी तर कॉंग्रेसला २.६१ कोटी रुपये प्राप्त झाले होते. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा रिपोर्ट हा राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीवरून तयार करण्यात आला आहे. यानुसार देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना १२, ७४५, ६१ रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यापैकी तब्बल १०, ४७१, ०४ कोटी रुपये देणगीच्या स्वरुपात फक्त राष्ट्रीय पक्षांना मिळाले आहेत. तर उरलेली रक्कम प्रादेशिक पक्षांना मिळाली आहे.

दरम्यान गुजरातमधील विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसह कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षानंही जोर लावला आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यातील एक डिसेंबरला ८९ जागांसासाठी तर पाच डिसेंबरला ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर आठ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

IPL_Entry_Point