मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  OLA-UBER Ride : ओला-उबेरचा प्रवास महागणार; प्रत्येक राईडवर लागणार पाच टक्के सर्विस टॅक्स

OLA-UBER Ride : ओला-उबेरचा प्रवास महागणार; प्रत्येक राईडवर लागणार पाच टक्के सर्विस टॅक्स

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 28, 2022 09:50 AM IST

Service Tax On OLA-UBER Ride : तीस रुपयांच्या प्रवासभाड्यावर १५ रुपये सर्विस टॅक्स लावण्यात येणार आहे. त्यामुळं आता आगामी काळात ओला-उबेरच्या राईडसाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

Service Tax On OLA-UBER Ride
Service Tax On OLA-UBER Ride (HT)

Service Tax On OLA-UBER Ride : शहरांमध्ये सार्वजनिक वाहनांपेक्षा जलदगतीनं सेवा देणाऱ्या ओला-उबेरचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. कारण आता ३० रुपयांवरील प्रवासशुल्कात पाच टक्क्यांचा सेवाकर लावण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे. कर्नाटकची राजधानी बंगळूरुसह राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या बेळगावात ओला-उबेरचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यानं सरकारचा हा निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळं ओला-उबेर कंपन्या टॅक्सी ड्रायव्हरकडून हे शूल्क आकारणार की प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणार?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारच्या या निर्णयानंतर या दोन्ही कंपन्यांकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळं आता प्रवाशांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

ओला-उबेर या कंपन्या ड्रायव्हरकडून नियमापेक्षा अधिक पैसे आकारत असल्याचा आरोप सातत्यानं होत होता. याशिवाय ओला-उबेरकडून प्रवाशांचीही आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या होत्या. त्यानंतर आता कर्नाटक सरकारनं ओला-उबेर या कंपन्याच्या प्रत्येक राईडवर सेवाशूल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ऑटोरिक्षा प्रवासाचं कमीत कमी शूल्क ३० रुपये इतकं करण्यात आलं आहे. या शूल्कावरील प्रवासानंतर प्रतिकिलोमीटर पंधरा रुपये सरकारकडून आकारले जाणार आहेत. त्यामुळं आता या कंपन्या प्रवाशांकडून कराचे पैसे वसूल करणार का?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

कर्नाटक सरकारनं लावलेला कर नेमका कुणाकडून वसूल केला जाईल आणि प्रत्येक राईडचं शूल्क कशाप्रकारे लावण्यात येणार आहे, याचं स्पष्टीकरण दोन्ही कंपन्यांनी देण्याची गरज असल्याची मागणी कर्नाटकातील ऑटोरिक्षा युनियनच्या अध्यक्षांनी केली आहे. याशिवाय पुढच्या वर्षी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका असल्यानं सरकारला हा निर्णय तारणार की महागात पडणार, याबद्दलची तर्कवितर्क लावले जात आहेत.

IPL_Entry_Point