मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shraddha Murder Case: मुंबई पोलिसांनी फोन केला अन् आफताबनं पुरावे नष्ट केले; तपासात धक्कादायक खुलासा

Shraddha Murder Case: मुंबई पोलिसांनी फोन केला अन् आफताबनं पुरावे नष्ट केले; तपासात धक्कादायक खुलासा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 28, 2022 08:27 AM IST

Shraddha Walker Murder Case : दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबची चौकशी सुरू केल्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

Shraddha Walker Murder Case
Shraddha Walker Murder Case (HT)

Shraddha Walker Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताब पुनावालानं कोर्टात गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता त्याची नार्को टेस्ट केली जाणार होती, परंतु तो आजारी असल्यानं या टेस्टची परवानगी पोलिसांना मिळाली नाही. त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू ठेवला असून यात अनेक धक्कादायक खुलासे आरोपीनं केलेले आहेत. त्यातच आता मुंबईतील वसई पोलिसांनी आरोपी आफताबला चौकशीसाठी फोन केला आणि त्यानंतर त्यानं पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आफताबची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं वसई पोलिसांकडून प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आरोपी आफताब आणि त्याच्या नातेवाईकांचीही चौकशी केली. श्रद्धा वालकर गायब असल्याची तक्रार ऑक्टोबरमध्ये पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच महिन्यात आफताबला फोन करून चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यानंतर आफताब अधिक सतर्क झाला आणि त्यानं श्रद्धा मर्डर केसमधील पुरावे नष्ट करायला सुरुवात केली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबला जंगलात नेऊन प्रकरणाचा तपास केला. यावेळी मृत श्रद्धाची कवटी आणि हाडं सापडली. याशिवाय श्रद्धाची हत्या करण्यासाठी आरोपी आफताबनं श्रद्धाची कवटी फोडण्यासाठी हातोड्याचा आणि मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी धारदार करवतीचा वापर केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आफताब आणि श्रद्धाचा सीडीआर तपासायला सुरुवात केली असून या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे का, हे ही तपासलं जात आहे.

IPL_Entry_Point