मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सायकलिंग बेतली जीवावर, भरधाव कंटेनरनं धडक दिल्यानं कॅनडात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

सायकलिंग बेतली जीवावर, भरधाव कंटेनरनं धडक दिल्यानं कॅनडात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 28, 2022 07:55 AM IST

Road Accident In Canada : सायकलिंग करण्यासाठी कार्तिक बाहेर पडला होता. परंतु भरधाव कंटेनरनं त्याला उडवल्यानंतर कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.

Road Accident In Canada Today
Road Accident In Canada Today (HT)

Road Accident In Canada Today : सकाळी सायकलिंग करताना रस्ता ओलांडत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला कंटेनरनं उडवल्याची घटना समोर आली आहे. कॅनडातील टोरंटोत ही घटना घडली असून या अपघातात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. कार्तिक सैनी असं मृत भारतीय विद्यार्थ्याचं नाव असून त्यानंतर आता त्याला अंत्यसंस्कारासाठी भारतात आणलं जाणार आहे. कॅनडात मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात. त्यामुळं दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील टोरंटो शहरात शिक्षण घेत असलेला कार्तिक हा सायकलिंग करण्यासाठी सकाळी घराबाहेर पडला होता. रस्ता ओलांडत असताना त्याला एका कंटेनरनं जोराची धडक दिली. त्यामुळं कार्तिक लांब जाऊन पडला. त्यानंतर त्याला एका पिकअपनंही उडवलं. या दुहेरी अपघातात जबर मार लागल्यानं कार्तिकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना स्थानिकांना समजताच त्यांनी कार्तिकला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं.

कार्तिक सैनी हा मूळ हरयाणा राज्याचा रहिवासी आहे. उच्च शिक्षणासाठी त्यानं कॅनडाच्या टोरंटोमधील शेरिडन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आता त्याच्या मृत्यूनंतर रस्ता सुरक्षेसाठी कार्तिकचं स्मारक तयार करण्यात येणार असल्याचं टोरंटो पोलिसांनी सांगितलं. याशिवाय या घटनेमुळं कार्तिक शिकत असलेल्या शेरिडन कॉलेजमध्येही शोक व्यक्त करण्यात आला आहे. कार्तिकच्या निधनामुळं कॉलेजमधील सर्वांना दुख: झालं आहे. आम्ही त्याच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत असल्याचा शेरिडन कॉलेज प्रशासनानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग