मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chhattisgarh New CM: छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री ठरला; भाजपकडून विष्णू देव साईंच्या नावावर शिकामोर्तब

Chhattisgarh New CM: छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री ठरला; भाजपकडून विष्णू देव साईंच्या नावावर शिकामोर्तब

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 10, 2023 04:54 PM IST

Vishnu Deo Sai Named Chhattisgarh Chief Minister: छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भाजप नेते विष्णू देव साई यांची निवड करण्यात आली आहे.

Vishnu Deo Sai
Vishnu Deo Sai

Chhattisgarh New Chief Minister: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांनी भाजपने त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे. नुकतीच रायपूर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांनी नवनिर्वाचित आमदारांची चर्चा केली. त्यानंतर भाजप नेते विष्णू देव साई यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांचे नाव आघाडीवर होते. छत्तीसगडमध्ये १५ वर्ष सत्ता गाजवल्यानंतर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, तरीही रमण सिंह हे छत्तीसगडच्या राजकारणात भाजपचा सर्वात मोठा चेहरा मानला जातो. रमण सिंह हे गरिबांचे डॉक्टर आणि चौरवाले बाबा म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रेणुका सिंह यांचेही नाव होते. रेणुका सिंह सध्या भारत सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. राज्यातील भरतपूर सोनहाट मतदारसंघातून निवडणूक जिंकून रेणुका सिंह विधानसभेत पोहोचल्या आहेत. रेणुका सिंह यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार गुलाब कामरान यांचा पराभव केला. रेणुका सिंह हे छत्तीसगडमधील आदिवासी महिला आमदारांचा मोठा चेहरा असल्याने त्यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

सातवेळा आमदार आणि मंत्री रवींद्र चौबे यांचा पराभव करणारे ईश्वर साहू यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते भाजप कार्यालयातही पोहोचले होते. कुशाभाऊ ठाकरे कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर ते म्हणाले होते की, "छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यावेळी त्यांना छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी पक्ष ठरवेल, अशी प्रतिक्रिया दिली होती.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यात बहुमत मिळाले. भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बाजी मारली. छत्तीसगडनंतर लवकरच भाजप राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करेल.

IPL_Entry_Point

विभाग