पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तराखंडमध्ये दोन दिवसीय ग्लोबल इन्वेस्टर्स समिटची सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना एक आवाहन केले जेणेकरून देशाचे चित्र पालटले जाईल. उत्तराखंडचा कायापालट करण्यासाठी या पर्वतीय राज्याला वेडिंग डेस्टिनेशन बनवले पाहिजे. मोदींनी तरुणांना वेड इन इंडियाचे आवाहन केले.
मोदींची 'वेड इन इंडिया' मिशन-
पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडला परफेक्ट वेडिंग डेस्टिनेशन म्हटले. त्यांनी म्हटले की, मी देशातील धनाड्य लोकांना सांगू इच्छितो की, आपल्याकडे मानले जाते की, जे विवाह होतात त्यांची जोडी देव बनवतो. मला हे समजत नाही की, जर जोड्या देव बनवत असेल तर आपल्या वैवाहिक जीवनाची सुरूवात या देवाच्या चरणी न करता परदेशात जाऊन का करतात? मला वाटते की, देशातील तरुणांसाठी मेक इन इंडियाच्या धर्तीवर वेडिंग इन इंडिया मोहीम चालवली पाहिजे. विवाह भारतातच करा.
वेडिंग डेस्टिनेशन बनेल उत्तराखंड-
पीएम मोदींनी म्हटले की, मला वाटते की, तुम्ही गुंतवणूक करा अथवा न करा ते जाऊ द्या.. कमीत कमी येत्या पाच वर्षात आपल्या कुटूंबातील कमीत कमी एक विवाह उत्तराखंडमध्ये करा. जर एका वर्षात ५ हजार विवाह झाले तरी नवीन इंफ्रास्ट्रक्चर उभे राहील.
मोदींनी म्हटले की, बदलत्या जमान्यात भारतातही परिवर्तनाची हवा जोरदार वाहत आहे. उत्तराखंडमध्ये गुंतवणूकदारांसाठी खूप मोठी बाजारपेट तयार होत आहे. उत्तराखंडमध्ये हाउस ऑफ हिमालय ब्रँड लाँच झाला आहे. हे उत्तराखंडमधील स्थानिक उत्पादन परदेशी बाजारात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न व्होकल फॉर लोकल आणि व्होकल फॉर ग्लोबल ची कॉन्सेप्ट मजबूत करतो. यामुळे उत्तराखंडमधील मालाला परदेशात बाजार मिळेल.