मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistani Crisis : देशातील बँका कंगाल, महागाईने जनता बेहाल; मात्र PM शरीफ करणार कॅबिनेटचा विस्तार

Pakistani Crisis : देशातील बँका कंगाल, महागाईने जनता बेहाल; मात्र PM शरीफ करणार कॅबिनेटचा विस्तार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 11, 2023 04:12 PM IST

पाकिस्तान कर्जाच्या खाईत पडलेला असताना पंतप्रधान शरीफ मंत्रिमंडळाचे विस्तार करणार असल्याने यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

पंतप्रधान शरीफ
पंतप्रधान शरीफ

कर्जात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानमध्ये राजकारण मात्र थांबलेले नाही. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल व विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत. आधीच एका आकाराने मोठ्या मंत्रिमंडळात विशेष सहायक भरती करण्याच्या निर्णयावरून पाकिस्तानी सरकार टीकेचा सामना करत असताना, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानसाठी हा कठीण निर्णय आहे. 

मागील वर्षी एप्रिलमध्ये सत्तेत आलेल्या पंतप्रधान शहबाज शरीफ आपल्या विशेष सहायकांच्या नेमणुकीवरून व मंत्रिमंडळाच्या केलेल्या अनेक विस्तारामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 

माजी खासदार व वकील मुस्तफा नवाज खोखर, हारून शरीफ व अन्य लोकांनी पीएमएल-एन च्या नेतृत्वातील सत्ताधारी आघाडीवर आरोप केला आहे. आर्थिक संकटाच्या काळात कॅबिनेटचा आकार वाढवणे जनतेशी धोका आहे. 
LIC चा अदानींना अखेर धक्का; अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये अधिकची गुंतवणूक न करण्याचा निर्णय

ट्रेंडिंग न्यूज

माजी खासदाराने म्हटले की, जो देश आपल्या इतिहासातील सर्वात कठीण काळातून जात आहे. असे असताना सरकार कॅबिनेट विस्तार करून असंवेदनशीलता दाखवली आहे. सामान्य लोकांकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही आर्थिक साधन राहिलेले नाही. 

IPL_Entry_Point

विभाग