मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात AAP ने सुरु केली मोठी कँपेन

Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात AAP ने सुरु केली मोठी कँपेन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 25, 2024 10:08 PM IST

Arvind Kejriwal Arrested : केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते सातत्यानेनिषेधाच्या नवनवीन पद्धती अवलंबत असताना दिसत आहे. पक्षाने आता सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे.

केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात AAP ची सोशल मीडिया मोहीम
केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात AAP ची सोशल मीडिया मोहीम

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज आपकडून संपूर्ण देशात सोशल मीडिया कँपेन लाँच केली गेली. या अंतर्गत AAP नेत्यांनी सोशल मीडियावर अरविंद केजरीवाल यांचा DP (प्रोफाईल फोटो) लावण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या मोहिमेची सुरूवात केली असून सर्व सोशल मीडिया प्लेटफॉर्मवरील DP बदलण्यात आली आहे.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते सातत्याने निषेधाच्या नवनवीन पद्धती अवलंबत असताना दिसत आहे. पक्षाने आता सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे. ज्या अंतर्गत आम आदमी पार्टीचे सर्व नेते त्यांच्यासोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केजरीवाल यांचा डीपी ठेवत आहेत.

याडीपीमध्ये आम आदमी पार्टीने केजरीवाल यांचा फोटो लावला असून मोदींची सर्वात मोठी भीती – केजरीवाल, अशी घोषणा दिली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री व आप नेत्या आतिशी यांनी या कँपेनबद्दल सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदी, भाजपा आणि ईडीने खोट्या प्रकरणात अटक केली आहे, गेल्या दोन वर्षापासून ईडी या प्रकरणाचा तपास करत असून त्यांना एक रुपयाही सापडला नाही.

 

पंतप्रधान मोदींना माहिती आहे की, त्यांना केवळ एकच नेते आव्हान देऊ शकतात ते म्हणजे केजरीवाल. ज्याप्रमाणे रावणाला माहित होतं की भगवान श्रीराम त्याचा सर्वनाश करणार आहेत, त्याचप्रमाणे मोदींनाही माहिती आहे केजरीवालच त्यांचा पराभव करणार आहेत.

आज संपूर्ण देशात सोशल मीडियावर डी.पी. कँपेन सुरू केली गेली. त्यामध्ये आम आदमी पार्टीचे सर्व नेते, आमदार व कार्यकर्ते आपले डी.पी. बदलत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री ईडीच्या कोठडीत आहेत. मात्र अटकेनंतरही त्यांनी दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. केजरीवाल तुरुंगातूनच राज्य कारभार चालवणार का, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

IPL_Entry_Point