मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Anna Hazare: अण्णा हजारे समाजद्रोही आणि बेईमान; काँग्रेस नेत्याची जहरी टीका

Anna Hazare: अण्णा हजारे समाजद्रोही आणि बेईमान; काँग्रेस नेत्याची जहरी टीका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 01, 2022 12:29 PM IST

Udit Raj Slams Anna Hazare: काँग्रेस नेते उदित राज यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Anna Hazare
Anna Hazare

Udit Raj Slams Anna Hazare: दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या मद्य धोरणाला आक्षेप घेत अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता टीकेच्या रडारवर आले आहेत. 'भाजप अण्णा हजारे यांचा वापर करून घेतोय असा आरोप केजरीवाल यांनी केल्यानंतर आता काँग्रेस नेते उदित राज यांनी अण्णांवर अत्यंत जहरी शब्दांत टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उदित राज यांनी ट्वीट करून अण्णा हजारे यांच्यावर तोफ डागली आहे. अण्णा हजारे हे समाजद्रोही, महाधूर्त आणि बेईमान आहेत, अशी बोचरी टीका उदित राज यांनी केली आहे. अण्णांनी केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्ली सरकारच्या धोरणांवर टीका केल्यानंतर उदित राज यांनी पहिलं ट्वीट केलं होतं. ‘अण्णा हजारे हे समाजसेवक नसून समाजद्रोही आहेत. भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरून अण्णा हजारे यांनी यूपीएच्या सरकारवर स्पेक्ट्रम आणि कोळसा खाण वाटपात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते. हे सगळे आरोप चुकीचे ठरले होते. त्यासाठी बेईमान अण्णा हजारे यांनी माफी मागितली पाहिजे,’ असं उदित राज यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आहे.

‘अण्णा हजारे हा महाधूर्त माणूस आहे. हजारे यांनी यापूर्वी भ्रष्टाचाराचे जे मुद्दे उपस्थित केले होते, त्याचं काय झालं? लोकपालचं काय झालं?,’ असा सवाल उदित राज यांनी केला आहे.

<p>Udit Raj Tweet</p>
Udit Raj Tweet

काँग्रेस सरकारच्या काळात अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनं करून सरकारला 'सळो की पळो' करून सोडलं होतं. देशात सत्तांतर झाल्यानंतर मात्र अण्णा हजारे यांनी कुठलंही मोठं आंदोलन केलं नाही. त्यामुळं विरोधक त्यांच्या भूमिकेवर सातत्यानं संशय उपस्थित करत आले आहेत.

केजरीवाल टीका न करता सगळं बोलून गेले!

अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सरकारच्या धोरणांवर टीका करणारं पत्र नुकतंच लिहिलं होतं. हे पत्र व्हायरल झालं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी थेट अण्णांवर टीका केली नाही. मात्र, अण्णा हजारे यांचा राजकीय वापर होत असल्याचं म्हटलं होतं. भाजपकडं आमच्या विरोधात लढायला कुठलेच मुद्दे शिल्लक नसल्यानं ते अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडत आहेत, असं केजरीवाल म्हणाले होते. त्यातून अण्णा हजारे हे भाजपची भाषा बोलत असल्याचं त्यांनी अप्रत्यतक्षपणे सुचवलं होतं.

IPL_Entry_Point

विभाग