मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amit Shah: सरकारी पोर्टलवर डाळीची विक्री करा; थेट बँक खात्यात पैसे येणार, अमित शाहांची घोषणा

Amit Shah: सरकारी पोर्टलवर डाळीची विक्री करा; थेट बँक खात्यात पैसे येणार, अमित शाहांची घोषणा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 04, 2024 10:21 PM IST

Tul Dal Government Portal: तूर डाळ विक्रेत्यांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टल लॉन्च केले आहे.

Amit Shah
Amit Shah (HT)

NAFED And NCCF: केंद्र सरकारने डाळ विकून उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू केले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी गुरुवारी या पोर्टलचा शुभारंभ केला. या पोर्टलद्वारे शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतात आणि बाजारभावाने विकू शकतात. सध्या पोर्टलवर तूरडाळ विकली जाऊ शकते. लवकरच उडीद आणि मसूर तसेच मका उत्पादक शेतकऱ्यांसाठीही अशीच सुविधा सुरू करण्यात येणार आहे. अमित शहा यांनी चाचणीचा भाग म्हणून पोर्टलद्वारे २५ तूर विक्रीदारांच्या खात्यात सुमारे ६८ लाख रुपये पाठवले.

सहकारी दोन केंद्रीय नोडल एजन्सी म्हणजे नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड डाळींचा 'बफर स्टॉक' राखण्यासाठी सरकारच्या वतीने डाळींची खरेदी करतात. जेव्हा डाळींच्या किंमती एमएसपीच्या खाली जातात, त्यावेळी या एजन्सी योग्य भावाने डाळ खेरदी करतात.

शेतकऱ्यांना डाळींची लागवड करण्यापूर्वी नाफेड आणि एनसीसीएफच्या वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. पिकाच्या उत्पादनानंतर शेतकरी त्यांची तूरडाळ एमएसपीवर ऑनलाइन पोर्टलवर विकू शकतात. शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या डाळीचे पैसे दिले जातील. जर डाळींची किंमत एमएसपीपेक्षा जास्त असेल तर सरकार जास्त किंमत देण्याचे सूत्र तयार करेल, असे अमित शाह म्हणाले.

मालाला भाव मिळत नसल्याने कडधान्य पेरणी टाळत आहेत. शेतकऱ्यांनी डाळीचे उत्पादन केल्यानंतरही त्यांनी आपला माल जिथे जास्त भाव मिळतो त्या बाजारात विकला तरी वेबपोर्टलवर निश्चितपणे नोंदणी करावी, असे त्यांनी सांगितले. परंतु किमान किंमत एमएसपी पेक्षा कमी असल्यास नाफेड आणि एनसीसीएफ निश्चितपणे त्यांच्या उत्पादनाची खरेदी करतील ही सरकारची हमी आहे. अमित शहा म्हणाले, सरकार भारताला वाटाणा, उडीद आणि मसूर यांच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करीत आहे.

कडधान्यांची लागवड कमी झाल्याने हे पोर्टल सुरू करण्यात आले. २०२३-२४ वर्षात दूर डाळीचे उत्पदनात सलग दुसऱ्या वर्षी घट होण्याचा अंदाज आहे. २०१६- २०१७ खरीप हंगामात पिकांची ४८.७ लाख टन तूर विक्री झाली. त्यानंतर २०२२-२३ मध्ये तूर उत्पादनात घट झाल्याचे पाहायला मिळाली. या काळात ३३.१ लाख टन तूरीचे उत्पादन झाले. यावर्षी तूर उत्पादन ३४.२ लाख टन मिळण्याची शक्यता आहे.

अमित शाह म्हणाले की, तूर नंतर उडीद आणि मसूर डाळींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक खरेदी पोर्टल देखील सुरू केले जाईल. उडीद आणि मसूर ही दोन अन्य डाळी आहेत, ज्यासाठी देश आयातीवर अवलंबून आहे. हे पोर्टल खात्रीशीर खरेदी त्यांचे उत्पादन वाढविण्यात मदत करेल.

WhatsApp channel

विभाग