मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Selu Murder Case : पैशांच्या वादातून मित्राच्या गळ्यावरून फिरवलं कटर; पोलिसांकडून आरोपीला अटक

Selu Murder Case : पैशांच्या वादातून मित्राच्या गळ्यावरून फिरवलं कटर; पोलिसांकडून आरोपीला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 24, 2022 12:23 PM IST

Parbhani Murder Case : हत्येपूर्वी संतोष आणि हेमंत यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. परंतु दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर हेमंतनं संतोषचा गळा चिरून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Selu Parbhani Murder Case
Selu Parbhani Murder Case (HT)

Selu Parbhani Murder Case : काही दिवसांपूर्वीच परभणी शहरात एका युवकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आता जिल्ह्यातील सेलू शहरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून एका तरुणाचा गळा चिरण्यात आल्यानं सेलू शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात आरोपी हेमंत गंडले आणि मृत संतोष आवटे यांच्यात काही दिवसांपूर्वी आर्थिक व्यवहार झाला होता. परंतु त्यानंतर याच कारणावरून दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर हेमंतनं संतोषला सेलूतील मुख्य चौकात बोलावलं, तेव्हा या दोघांमध्ये काही वेळ बोलणं झाल्यानंतर शिवीगाळ झाली. त्यानंतर संतापलेल्या हेमंतनं कटरच्या सहाय्यानं संतोषचा गळा चिरून घटनास्थळावरून पळ काढला. चौकात थांबलेल्या इतर लोकांना ही घटना समजताच त्यांनी संतोषला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर आता पोलिसांनीही या प्रकरणात तातडीनं कारवाई करत आरोपी हेमंतला बेड्या ठोकल्या आहेत.

थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल...

आरोपी हेमंत आणी मृत संतोष यांच्यातील वादाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यात दोघांमध्ये वाद होत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर हेमंतनं खिशातून कटर काढून संतोषचा गळा कापल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपी हेमंतला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

IPL_Entry_Point

विभाग