मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha Crime News : धामण समजून मण्यारसोबत खेळणं जीवावर बेतलं; विषारी साप चावल्यानं पेंटरचा मृत्यू

Wardha Crime News : धामण समजून मण्यारसोबत खेळणं जीवावर बेतलं; विषारी साप चावल्यानं पेंटरचा मृत्यू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 01:29 PM IST

Wardha Crime News : विषारी मण्यार सापासोबत खेळताना सापानं चावा घेतल्यानं वर्ध्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Wardha Crime News
Wardha Crime News (HT)

Wardha Crime News Marathi : सापांबद्दल असलेल्या अज्ञानातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्हात घडली आहे. तरुणानं धामण समजून मण्यार जातीच्या विषारी सापाला हातात घेतलं होतं. त्यावेळी चिडलेल्या सापानं तरुणाला चावा घेतला, त्यानंतर काही क्षणांतच तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशांत उर्फ बबलू काकडे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

पेशानं पेंटर असलेल्या प्रशांतनं संध्याकाळी त्याच्या शेजारच्या घरातून मण्यार जातीचा साप पकडला होता. त्याला सापाबद्दलचं कोणतंही ज्ञान नसल्यानं त्याला हा साप धामण जातीचा असल्यानं त्यानं सापाला हातात घेतलं. त्यानंतर त्यानं त्याचा एक व्हिडिओही बनवला. त्यानंतर त्यानं सापाला खिशात टाकण्याचा प्रयत्न केला असता सापानं त्याला अनेक ठिकाणी दंश केला. परंतु त्यावेळी त्याला काहीच झालं नाही.

परंतु रात्री साठ ते नऊ वाजेच्या सुमारात प्रशांतला चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. परंतु साडेअकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच वर्ध्यात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन व्यक्तींना सापाशी खेळणं जीवावर बेतलं होतं. पिंपरी मेघे परिसरात दोन तळीरामांना सापाला हातात घेऊन दुचाकीवर स्टंटबाजी केली होती. त्यावेळी त्यांना सापानं चावा घेतला. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पेंटरकाम करणाऱ्या प्रशांतचा सापानं दंश केल्यानं मृत्यू झाल्यामुळं जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

IPL_Entry_Point

विभाग