Koyta Gang Pune : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस; पर्वती पायथा भागात तरुणावर जीवघेणा हल्ला-young man attacked by koyta gang in parvati paytha in pune city see details ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Koyta Gang Pune : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस; पर्वती पायथा भागात तरुणावर जीवघेणा हल्ला

Koyta Gang Pune : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस; पर्वती पायथा भागात तरुणावर जीवघेणा हल्ला

Mar 20, 2023 03:56 PM IST

Koyta Gang Pune : पुण्यातील पर्वती पायथा भागामध्ये एका तरुणावर कोयता गँगकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Koyta Gang In Parvati Paytha Pune
Koyta Gang In Parvati Paytha Pune (HT_PRINT)

Koyta Gang In Parvati Paytha Pune : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील हडपसर, मांजिरी, सिंहगड रोड, नवी पेठ आणि येरवडा या भागांमध्ये कोयता गँगकडून सामान्यांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. प्रशासनानं कठोर पावलं उचलल्यानंतरही कोयता गँगचे काही हल्ले काही थांबत नाहीये. त्यातच आता पुण्यातील पर्वती पायथा या भागामध्ये कोयता गँगकडून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं आता पुण्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोयता गँगकडून झालेल्या हल्ल्यात तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष चव्हाण नावाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत पर्वती पायथा परिसरातून निघाला होता. त्यावेळी नवथाथ वाडकर आणि शेखर वाघमारे या दोन आरोपींनी आयुषवर कोयत्यानं वार करत त्याचा ठार मारण्याचा प्रयत्न केला. पूर्ववैमनस्यातूनच तरुणावर कोयता गँगकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींनी आयुषवर हल्ला करत दुचाकीवरून पळ काढला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याशिवाय दोन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वीच नाना पेठेत कोयता गँगकडून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याशिवाय सिंहगड रोडवर मध्यरात्री आरोपींनी निष्पाप नागरिकांवर कोयत्यानं हल्ले केले होते. त्यानंतर आता पर्वती पायथ्यावरही एका तरुणावर हल्ला करण्यात आल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले हे करी आहेत.

Whats_app_banner