मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी पेठा, मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी पेठा, मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 21, 2023 01:08 PM IST

Pune Water Supply : पुण्यात काही भागात महानगर पालिकेतर्फे 'फ्लो मीटर' बसवण्यात येणार असल्याने गुरुवारी पेठ परिसर आणि मध्यवर्ती भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Pune Water Supply
Pune Water Supply

 पुणे : पुणे शरातील काही भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ‘फ्लो मीटर’ बसविण्यात येणार आहे. यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यातील पेठ परिसरात आणि मध्यवर्ती भागात गुरुवारी (दि २३)पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी देखील उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महापलिकेने पाणी गळती आणि पाणी पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही नवी यंत्रणा तयार केली आहे. यासाठी पलो मीटर बसवले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.

या भागातील पाणीपुरवठा होणार विस्कळीत

जुना होळकर जलशुद्धीकरण अंतर्गत एचई फॅक्टरी, अहिरेगांव, अतुलनगर परिसर, वारजे-माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे, दत्तवाडी परिसार, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगगर परिसर, स्वारगेट परिसर, सिंहगड रस्त्यावरील रोहन कृतिका आणि लगतचा परिसर, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा पेठ, वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, साळुंखे विहार,ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यनदकर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर, माळवाडी, भोसले गार्डन, आकाशवाणी परिसर, लक्ष्मी काॅलनी, महादेव नगर, मगरपट्टा या भागाचा पाणीपुरठा गुरुवारी बंद राहणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग