Mumbai Borivali Metro News: बोरिवलीमधील एकसर आणि मंडपेश्वर स्थानकांदरम्यान आज सकाळी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत झाली, अशी माहिती मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच एमएमआरडीएने दिली. एमएमआरडीएने त्वरीत तांत्रिक बिघाड दूर केला आणि मेट्रो सेवा पूर्ववत करण्याचे अश्वासन दिले. मात्र, अचानक रस्त्यामध्ये मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी चक्क रुळांवरून चालत जावे लागले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तांत्रिक बिघाडामुळे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी रुळावरून चालत जावे लागले. मेट्रो ट्रॅकवरून प्रवाशांना चालतानाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली. तसेच एमएमआरडीने नेमके कशामुळे मेट्रो सेवा ठप्प झाली, याबाबत माहिती दिली नाही.
एमएमआरडीने प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेत व्यक्त केले. तसेच एकसर आणि मंडपेश्वर दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देणारे निवेदन जारी केले. तसेच समस्यांचे निराकरण झाले असून मेट्रो सेवा पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली. मात्र, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमदरम्यान मेट्रो सेवा पूर्वरत करण्यात थोडा विलंब झाला.
संबंधित बातम्या