गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची लेक आयराच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. आयराने ३ जानेवारी रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. आता १३ जानेवारी रोजी आयरा खानच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या रिसेप्शनला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकार हजर होते. दरम्यान, कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासनच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनला जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार हजर होते. त्यामुळे एण्ट्री करण्यापूर्वीच हे कलाकार फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देत होती. अभिनेत्री श्रुती हासन ही बहिणीसोबत फोटोग्राफर्सला पोझ देत असताना अभिनेते धर्मेंद्र तेथे येतात. ते श्रुतीच्या पुढ्यात उभे राहतात. ते पाहून श्रुती बहिणीसोबत लगेच बाजूला होते. तिच्या या कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. श्रुती मोठ्यांचा आदर करते असे म्हणत नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.
वाचा: सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीचा अपघात, थोडक्यात बचावला
श्रुतीने आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनसाठी गोल्डन रंगाचा ब्लाऊज आणि काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर तिच्या बहिणीने देखील काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या या लूक आणि कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या सोशल मीडियावर श्रुतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
आयरा आणि नुपूरचे रिसेप्शन मुंबईतील निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. या रिसेप्शनला जवळपास संपूर्ण बॉलिवूड हजर होते. रिसेप्शनमध्ये आयराने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर नुपूरने काळ्या रंगाचा नेहरु कुर्ता आणि सलवार घातली होती. सलमान खान, सुश्मिता सेन, जुही चावला, माधुरी दीक्षित, बोनी कपूर, कपिल शर्मा, शहनाज गिल, जॅकी श्रॉफ, सोनाली बेंद्रे, रणबीर कपूर, जया बच्चन, सोनाली बेंद्रे, श्वेता नंदा आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली.