अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. त्याचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरत असतो. सध्या नवाज त्याच्या आगामी चित्रपटाचे श्रीलंकेमध्ये चित्रीकरण करत आहे. चित्रीकरण करत असताना नवाजचा मोठा अपघात झाला आणि या अपघातात तो थोडक्यात बचावला आहे.
नवाजचा 'सैंधव' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन तो सध्या करताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने श्रीलंकेत चित्रीकरण करतानाचा एक अनुभव सांगितला आहे. "श्रीलंकेत 'सैंधव'चे शूटिंग करत असताना मी थोडक्यात बचावलो आहे. या सिनेमाचे आम्ही समुद्रात शूटिंग करत होतो. त्यावेळी एक मोठी लाट आली आणि मी जहाजात पडलो. समुद्रात पडण्यापासून थोडक्यात बचावलो. महत्त्वाची बात म्हणजे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल" असे नवाज म्हणाला.
वाचा: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?
नवाज 'सैंधव' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेश कोलानुने केले आहे. हा चित्रपट १३ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाज खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी नवाज प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने तेलुगूचे धडे घेतले आहेत. 'सैंधव' या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीसह वेंकटेश, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, जिशू सेन गुप्ता, मुकेश ऋषी आणि अंड्रिमा जेरेमिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत