मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan Rane : नारायण राणे-नीलम गोऱ्हे यांची सरकारी कार्यक्रमात बाचाबाची; परदेशी पाहुण्यांसमोर केली शोभा

Narayan Rane : नारायण राणे-नीलम गोऱ्हे यांची सरकारी कार्यक्रमात बाचाबाची; परदेशी पाहुण्यांसमोर केली शोभा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 24, 2023 09:00 AM IST

Narayan Rane Hassle With Neelam Gorhe : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधानभवनात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी भर कार्यक्रमात हुज्जत घातली.

नारायण राणे-नीलम गोऱ्हे
नारायण राणे-नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते तसेच परदेशी पाहुणे देखील यावेळी उसपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. राणे यांनी भाषणादरम्यान औचित्यभंग केल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला, तर राणे यांनी हुज्जत घालत आपले भाषण सुरूच ठेवले.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. दरम्यान, शिंदे-फडणवीस यांनी हा कार्यक्रम हायजॅक केला. दरम्यान, या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

नारायण राणे यांचे भाषण सुरू झाले तेव्हा त्यांच्या भाषणावर औचित्यभंगाचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. याची तक्रार देखील गोऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. मात्र, नारायण राणे यांनी न जुमानता भाषण सुरूच ठेवले. यावेळी दोघांमध्ये हमरीतुम्हरी देखील झाली.

नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक होत राणे यांचे भाषण बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणे यांनी न ऐकता आपले भाषण सुरूच ठेवले. राणेंनी ‘मी नाही थांबणार’ असे म्हणत “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो”, असा टोलाही गोऱ्हे यांना लगावला. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी राहुल नार्वेकर यांच्या दिशेने पाहत, 'हे काय चाललंय?म्हणत नापंसती दर्शवली. हा सर्व प्रकार उपस्थित सर्वांनी पाहिला.

 

IPL_Entry_Point

विभाग