मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balasaheb Thackeray: बाळासाहेब मुस्लिमविरोधी नव्हते, ‘हिंदूहृदयसम्राट’बद्दल अजित पवारांचं मोठं विधान

Balasaheb Thackeray: बाळासाहेब मुस्लिमविरोधी नव्हते, ‘हिंदूहृदयसम्राट’बद्दल अजित पवारांचं मोठं विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2023 08:55 PM IST

balasaheb thackeray birth anniversary : बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं आज विधीमंडळात अनावरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, बाळासाहेबांची खरी ओळख शिवसेनाप्रमुख आहे, असे मला वाटते.

balasaheb thackeray birth anniversary
balasaheb thackeray birth anniversary

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज विधीमंडळात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनेक नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. यावेळी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार म्हणाले की,बाळासाहेबांना आज हिंदुहृदयसम्राट असं ओळखलं जातं,पण त्यांची खरी ओळख ही शिवसेनाप्रमुख अशी आहे, असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्या तैलचित्रावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं लिहिण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अजित पवारांनी ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

विधीमंडळातील बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाकडून राज ठाकरे, स्मिता ठाकरे,अनुराधा जयदेव ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी कधीच कुठल्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यांनी कधीही मुस्लिमांना विरोध केला नव्हता. मात्र भारतविरोधी कारवाया व पाकिस्तान धार्जिण्या लोकांच्या ते कायम विरोधात होता. शिवसेनेचा मुंबईतील पहिला महापौर झाला. त्यावेळी बाळासाहेबांनी मुस्लिम नगरसेवकांची मदत घेतली होती.

राज्याच्या हितासाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावणं हे अभिमानाची गोष्ट आहे. जनमानसावर प्रचंड गारूड असलेलं दुसरं व्यक्तीमत्व नाही. त्यांच्या जगण्यात दुटप्पीपणा नव्हता, जे पोटात तेच ओठात होतं. त्यांनी राजकारणात कधीच तडजोड केली नाही.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या