मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : मुंबईबद्दलच्या माझ्या मतांवर ठाम आहे; उद्धव ठाकरेंचं शरद पवारांना उत्तर

Uddhav Thackeray : मुंबईबद्दलच्या माझ्या मतांवर ठाम आहे; उद्धव ठाकरेंचं शरद पवारांना उत्तर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 04, 2023 03:42 PM IST

Uddhav Thackeray Live : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray (PTI)

Uddhav Thackeray Live : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय व आपल्या आत्मचरित्रात त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत केलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

उद्धव ठाकरे पत्रकार परिषद Live Updates

 

  • जमीन भूमिपुत्रांची आहे. त्यांचं म्हणणं ऐकायलाच लागेल. स्थानिकांचा विरोध होत असेल तर मी स्थानिकांसोबत - उद्धव ठाकरे
  • बारसू समर्थक कोणाची सुपारी घेऊन लढतायत? तिथं उपऱ्यांनी जमिनी घेतल्यात. मग त्यांच्यासाठी भूमिपुत्रांशी लढताय का?; उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल
  • सीमाभागातील मराठी मतदारांनी जय भवानी, जय शिवाजी म्हणून एकजुटीनं मतदान करावं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करावं; उद्धव ठाकरे यांचं आवाहन
  • 'बजरंग बली की जय' असं म्हणून मतदान करा असं पंतप्रधान मोदी म्हणाल्याचं ऐकलंय. हिंदुत्वाची भूमिका मांडली म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मताधिकार काढला होता. त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी केली होती. आता निवडणूक आयोगाच्या कायद्यात बदल झाला असावा - उद्धव ठाकरे
  • शरद पवार सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतील. मी त्यांना कसा सल्ला देऊ शकतो - उद्धव ठाकरे
  • बिहारचे विधान परिषद सभापती मला भेटले, मात्र राजकीय चर्चा झालेली नाही - उद्धव ठाकरे
  • हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं - उद्धव ठाकरे
  • मुंबईबद्दलच्या माझ्या मतांवर ठाम आहे. ती मांडलेली आहे आणि मांडणार आहे. माझ्याकडून महाविकास आघाडीला कुठलाही तडा जाणार नाही हे आश्वासन देतो - उद्धव ठाकरे

  • प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. त्यामुळं मी महाराष्ट्रातील प्रत्येकाला कुटुंबाचा सदस्य वाटतो. त्यापेक्षा मी अधिक बोलणार नाही - उद्धव ठाकरे
  • उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात
  • महाविकास आघाडीचं भवितव्य काय? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडं लक्ष
  • थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकारांना संबोधित करणार
  • बिहार विधानपरिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या विरोधात आघाडी करण्याच्या संदर्भात ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

Uddhav Thackeray - Deveshchandra Thakur
Uddhav Thackeray - Deveshchandra Thakur
  • मुंबई तोडण्याचा विचार दिल्लीतील कुठल्याही नेत्याच्या मनात नाही. हा विषय आता थांबवावा, असं मत शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात व्यक्त केलंय. त्यावर उद्धव ठाकरे भूमिका मांडण्याची शक्यता
  • 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रात शरद पवार यांनी शिवसेनेबाबत अनेक मतं व्यक्त केली आहेत. त्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली पत्रकार परिषद
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद

IPL_Entry_Point

विभाग