मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Crime News : मयत शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे हडपले; बीडमध्ये तीन अधिकारी निलंबित

Beed Crime News : मयत शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे हडपले; बीडमध्ये तीन अधिकारी निलंबित

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 21, 2023 06:25 PM IST

Beed Crime News Marathi : शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याप्रकरणी बीडमध्ये तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Beed Crime News Marathi Live Updates
Beed Crime News Marathi Live Updates (HT)

Beed Crime News Marathi Live Updates : शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यातून परस्पर पैसे काढल्याप्रकरणी बीडमधील शाखा अधिकाऱ्यासह रोखपाल आणि तपासणीसाला निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका मयत शेतकऱ्यासह चौसाळ्यात १२ शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांना मिळणारी सर्व मदत ऑनलाईन झाल्यानंतरही त्यांच्या खात्यातून रक्कम काढल्यामुळं बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्यात आले होते. बँकेचा मेसेज आल्यानंतर शेतकऱ्यांनी पैसे काढण्यासाठी बँकेत धाव घेतली असता त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याशिवाय एका मयत शेतकऱ्याच्याही खात्यातील रक्कम कमी झाल्याचं लक्षात येताच चौसाळ्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.

त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत डीसीसी बँकेतील शाखा अधिकाऱ्यासह रोखपाल आणि तपासणीसाला निलंबित केलं आहे. निलंबित अधिकाऱ्यांनी बीडमधील १२ शेतकऱ्यांच्या खात्यातून नेमकी किती रक्कम परस्पर काढली, याची माहिती अजून समजू शकलेली नाही. परंतु आता हे प्रकरण केवळ १२ शेतकऱ्यांच्याच बाबतीत घडलेलं नसल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

IPL_Entry_Point