मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya Sabha निवडणुकीत दगा; यापुढे अपक्ष आमदारांना निधी नाही, मंत्र्याचा इशारा

Rajya Sabha निवडणुकीत दगा; यापुढे अपक्ष आमदारांना निधी नाही, मंत्र्याचा इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 11, 2022 10:11 PM IST

ज्या आमदारांनी राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दगा दिला,त्यांना आता निधी देताना विचार करावा लागेल, असा इशारा काँग्रेस नेत्याने अपक्षांना दिला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  - महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. भाजपने तीन मतांबाबत आक्षेप नोंदवल्याने मतमोजणी सात तास विलंबाने सुरु झाला. रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालात भाजपने सहाव्या जागेवर विजय मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. मात्र, भाजपचा हा विजय महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे ४१ मते घेऊन विजयी झाले. त्यामुळे बहुमताचा दावा आणि पुरेशा मतांची जुळवाजुळव केली असताना देखील पराभव कसा झाला याची चर्चा आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.

'ज्या आमदारांनी राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दगा दिला, त्यांना आता निधी देताना विचार करावा लागेल, आतापर्यंत अपक्ष आमदारांना झुकतं माप दिलं, विकास कामे आमच्या बरोबरीने करवून घेतली मात्र त्यांनी कालच्या निवडणुकीत मतदान करताना गद्दारी केली. यापुढे अपक्ष आमदारांना (Independent MLA) निधी दिला जाणार नाही.' असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. ते बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

वडेट्टीवार यांनी अपक्ष आमदारांना निधी न देण्याचा इशारा दिला असला तरी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र आघाडीतील आमदारांची नाराजी दूर करावी असा सल्ला दिला आहे.

भुजबळ म्हणाले, 'सरकार असताना आम्ही १७० ऐवजी १८० मतांची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो, तसंच तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर उफाळून आली आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक आमदार हा आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे. 

IPL_Entry_Point