मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Metro : मेट्रोचे काम काम सुरू असताना गर्डरवरून पडून मजुराचा मृत्यू

Thane Metro : मेट्रोचे काम काम सुरू असताना गर्डरवरून पडून मजुराचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 06, 2023 07:24 PM IST

Thane Metro Work : ठाण्यात मेट्रो ४ लाईनचे काम सुरू असताना गर्डरवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला.

मेट्रो कामावेळी अपघात
मेट्रो कामावेळी अपघात

ठाण्याजवळ मेट्रोचे काम सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील तीन हात नाक्यावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो लाइनचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी मेट्रोच्या गर्डरवरून पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हा अपघात कसा झाला याचा तपास केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ठाण्यात मेट्रो ४ म्हणजे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो लाईनचे काम सुरू आहे. या मार्गाच्या कामावेळी यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्या आहेत. ठाण्यातील तीन हात नाक्यावर आज दुपारी गर्डरवरून जमिनीवर कोसळ्याने एका मजुराचा मृत्यू झाला. वागले इस्टेट पोलीस घटनास्थळी पोहोचून घटनेचा तपास करत आहेत.

मुंबई मेट्रो लाइन ४ (ग्रीन लाइन) मुंबई शहरातील एक रॅपिड ट्रान्झिट मेट्रो लाइन आहे. एमएमआरडीए आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची एक संघटना या लाईनचे काम करत आहे.

३२.३२किमी (२०.०८ मैल) लाइन पूर्णपणे उंचीवर करण्यासाठी काम सुरू आहे. यामध्ये वडाळा (मुंबई )हून कासारवडावली (घोड़बंदर रोड, ठाणे) पर्यंत या लाईनवरचेंबूर, भांडुप, मुलुंड आणि तीन हात नाका आदि ३२ स्टेशन असणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग