मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milind Narvekar : आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात; चूक लक्षात येताच दिलं स्पष्टीकरण…

Milind Narvekar : आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात; चूक लक्षात येताच दिलं स्पष्टीकरण…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 27, 2023 12:46 PM IST

Milind Narvekar In Vidhan Sabha : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली आहे.

Milind Narvekar In Vidhan Sabha
Milind Narvekar In Vidhan Sabha (HT)

maharashtra assembly budget session 2023 : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली असून यावेळी आमदार नसतानाही ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे विधीमंडळाच्या सभागृहात बसल्याचं दिसून आलं. त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी नार्वेकर यांना चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते सभागृहातून बाहेर निघून गेले. त्यामुळं आता मिलिंद नार्वेकर यांच्या विधानसभेतील प्रवेशामुळं ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकं काय झालं?

शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या भाषणानं झाली. त्यावेळी ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे सभागृहात उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर हे आमदार नसल्यामुळं ते सभागृहात कसे काय उपस्थित राहिले?, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर मिलिंद नार्वेकर सभागृहात बाहेर निघून गेले. त्यामुळं आता सभागृहात फक्त आमदारांनाच प्रवेश दिला जात असताना सुरक्षारक्षकांनी मिलिंद नार्वेकर यांना सभागृहात प्रवेश कसा काय दिला?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रेक्षक गॅलरी समजून सभागृहात बसलो- नार्वेकर

नार्वेकर आमदार नसतानाही त्यांनी सभागृहात कसा काय प्रवेश केला?, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर मिलिंद नार्वेकर म्हणाले की, प्रेक्षक गॅलरी समजून मी विधानसभेच्या सभागृहात बसलो होतो. माझी चूक लक्षात आल्यानंतर मी तातडीनं बाहेर पडलो, असं म्हणत नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नार्वेकरांच्या आमदारकीचा मार्ग शिंदे गटातून जातो-शिरसाट

ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे विधानसभेच्या सभागृहात जाऊन बसल्याची माहिती समोर येताच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यावर प्रतिक्रिया देत त्यांना शिंदे गटात प्रवेश करण्याचं निमंत्रण दिलं आहे. मिलिंद नार्वेकर हे आमच्या संपर्कात असून त्यांना सभागृहात येण्याची घाई झालेली आहे. उद्धव ठाकरे त्यांना जवळ करत नाहीयेत. त्यामुळं त्यांच्या आमदारकीचा मार्ग हा शिंदे गटातून जातो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर शिंदे गटात कुणाकुणाला येण्याची इच्छा आहे, हे कळणार असल्याचंही आमदार संजय शिरसाट म्हणालेत.

IPL_Entry_Point