मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  KCR Rally: बीआरएसचे मिशन मराठवाडा, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची २४ एप्रिलला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा

KCR Rally: बीआरएसचे मिशन मराठवाडा, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची २४ एप्रिलला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 10, 2023 02:10 PM IST

BRS Rally In Sambhaji Nagar : संभाजीनगरमधील मेळाव्यात अनेक नेते केसीआर यांच्या बीआरएस या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

CM KCR Rally In Sambhaji Nagar
CM KCR Rally In Sambhaji Nagar (HT)

CM KCR Rally In Sambhaji Nagar : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आंध्रप्रदेशनंतर आता महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीच्या विस्तारासाठी जोरदार प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर मुख्यमंत्री केसीआर आता छत्रपती संभाजीनगर येथेही जाहीर सभा घेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकणार आहे. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेतकरी पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील प्रवेशामुळं जोरदार राजकीय चर्चा रंगलेली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभांचं नियोजन करत मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. येत्या २४ एप्रिलला मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे संभाजीनगरमध्ये येणार असून यावेळी ते जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे अभय पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना आणि शेतकरी नेते कैलास पवार यांनी नुकतंच हैदराबादमध्ये केसीआर यांची भेट घेत बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता या नेत्यांनी पक्षवाढीसाठी मराठवाड्यात चांगलाच जोर लावल्याचं दिसून येत आहे.

तेलंगणातील दुसरा पक्ष महाराष्ट्रात...

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीतून तेलंगणातील एमआयएमने महाराष्ट्रात एन्ट्री केली होती. त्यानंतर एमआयएमने राज्यातील विधानसभेत दोन आणि लोकसभेत एक जागा मिळवली होती. एमआयएमनंतर आता भारत राष्ट्र समितीनेही मराठवाड्यामार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये लक्ष केंद्रित केलं आहे.

IPL_Entry_Point