Mumbai Sunday local mega block : रविवारी मुंबईत देखभाल (Mumbai Local) दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आल्याने काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या उशिराने धावणार आहेतत्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत रहाणार आहे. या काळात माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांत थांबणार आहेत. नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार या स्थानकांत लोकलचा थांबा नसल्याने येथील प्रवाशांचे ब्लॉककाळात हाल होण्याची शक्यता असल्याने या वेळापत्रकाची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हार्बर मार्गावर पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत राहणार असून या काळात सीएसएमटी – बेलापूर / पनवेल लोकल सेवा आणि पनवेल – ठाणे लोकल रद्द करण्यात आली असून ब्लॉककाळात सीएसएमटी – वाशी, ठाणे – वाशी / नेरुळ, बेलापूर / नेरुळ ते उरण लोकल सेवा सुरू राहणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार असून सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. या काळात चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर धावणार आहेत. यामुळे अप आणि डाऊन दिशेकडील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही चर्चगेट लोकल वांद्रे आणि दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत.