Mumbai Local Train Mega Block 04 April 2024: मुंबईत रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वे, ट्रान्सहार्बर लाईनवर रविवारी (०४ एप्रिल २०२३) मेगा ब्लॉक घोषित करण्यात आहे. तर, पश्चिम रेल्वेकडून पश्चिम मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत लोकल सेवा बंद असेल. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येईल. तर या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबणार आहेत. तर पुढे विद्याविहार स्थानकापासून डाउन मार्गावर वळवण्यात येणार आहे. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.
ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवा सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत बंद असेल. हार्बर आणि उरण मार्गावर मेगाब्लॉक नसणार, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर उद्या रविवारी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. तर, गोरेगाव आणि बोरिवली स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक असेल. रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करणे, हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.