मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC Paper Leak : कसं होणार? महिला सुरक्षा रक्षकानं थेट वर्गात जाऊन प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले!

SSC Paper Leak : कसं होणार? महिला सुरक्षा रक्षकानं थेट वर्गात जाऊन प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 16, 2023 01:26 PM IST

SSC Paper Leak in Pune : अहमदनगर येथे १२च्या पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतांनाच आता पुण्यात देखील एक पेपर फुटीचे प्रकरण पुढे आले आहे. १० वीच्या गणिताचा फोटो एका सुरक्षा रक्षिकेच्या मोबाइल मध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.

SSC Paper Leak in Pune
SSC Paper Leak in Pune

पुणे : अहमदनगर येथील १२ वीच्या पेपरफुटीनंतर आता पुण्यात देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. १० वीच्या गणिताचा पेपर फुटला असून थेट वर्गात पेपर सुरू असतांना गणिताचा फोटो महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाइलमध्ये आढळला आहे. परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हा फोटो काढल्याने सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बिबवेवाडी इथल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात घडला.

ट्रेंडिंग न्यूज

मनीषा कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. अहमदनगर येथे १२ वीचा गणिताचा पेपर फुटला. त्यांतर मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत असतांना आणखी दोन पेपर फुटल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आता पुण्यातील एका केंद्रांवर १० वीच्या गणिताचा पेपर फुटल्याचे पुढे आले आहे. बिबवेवाडी इथल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात माहितीनुसार, १३ मार्चला गणित भाग एकचा पेपर होता.

यावेळी सुरक्षा रक्षक मनीषा कांबळे यांनी परीक्षा सुरू असताना थेट हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. दरम्यान या सेंटरवर बुधवारी (दि. १५) बोर्डाचे एक पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले. यावेळी ही सुरक्षा रक्षक महिलेच्या हालचाली पथकाला संशयित आढळल्या. या महिलेचा मोबाईल तपास पथकाने घेऊन तपासणी केली असता, त्यांच्या फोनमध्ये गणित भाग एक प्रश्न पत्रिकेचे फोटो दिसल्याने अधिकारीही चक्रावले.

यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली. मात्र, उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे पथकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

IPL_Entry_Point

विभाग