मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: आम्ही त्याच लढाईची वाट बघतोय; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक जबरदस्त टीझर

Dasara Melava: आम्ही त्याच लढाईची वाट बघतोय; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक जबरदस्त टीझर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 03, 2022 12:21 PM IST

Shivsena Dasara Melava Teaser: शिवसेनेनं दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर शेअर केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमींना दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Shivsena Dasara Melava: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दसरा मेळाव्यावरून बरंच राजकारण झालं. अखेर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना उच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली. आता शिवसेनेनं दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर शेअर केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमींना दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच शिंदे गटाला आव्हानही दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एक तर कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, कुणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय रहायचं नाही असं या टीजरमध्ये म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील बडे नेते आणि अनेक पदाधिकारीसुद्धा शिंदे गटात गेले. याच्याच संदर्भाने टीजरमध्ये म्हटलंय की, 'माझ्या हातात काय आहे, अधिकार म्हणून काहीच नाहीय पण तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने मिळालेली शक्ती आहे. तीच शक्ती घेऊन मी पुढे चाललोय, लढायला चाललोय."

सगळे येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी यात म्हटलंय. ही तीच शिवसेना आहे बघा गच्च भरलेली आहे. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. हे ठाकरे कुटुंब आहे संपवा, हे माझं ठाकरे कुटुंब आहे. या प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटुन पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतोय असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आवाहन करताना म्हटलंय की,'माझ्या शिवसैनिकांना, शिवसेना प्रेमींना उद्याच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यांनो, उत्साहात या, वाजत गाजत, गुलाल उधळत या पण शिस्तीने या." शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा असेल तेव्हाच बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा दसरा मेळावा घेणार आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल १० मैदाने केवळ पार्किंगसाठी बूक केली आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या