मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde Group: शिंदे गटानं ‘ही’ तीन चिन्ह केली सादर; आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा

Eknath Shinde Group: शिंदे गटानं ‘ही’ तीन चिन्ह केली सादर; आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 11, 2022 12:19 PM IST

Shinde Group Symbol : शिंदे गटानं नव्यानं तीन चिन्ह निवडणूक आयोगाला सूचवली आहेत. त्यामुळं आता निवडणूक आयोग शिंदे गटाला कोणतं चिन्ह देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Shinde Group Symbol
Shinde Group Symbol (HT_PRINT)

Shinde Group Symbol : निवडणूक आयोगानं शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव दिलेलं आहे. परंतु अजून कोणतंही चिन्ह दिलेलं नाही. परंतु आता शिंदे गटानं निवडणूक आयोगापुढे तीन चिन्ह सादर केले आहेत. त्यात ढाल-तलवार, पिंपळाचं झाड आणि तळपता सूर्य या तीन चिन्हांचा समावेश आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग शिंदे गटाला कोणतं चिन्ह देणार, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यापूर्वी शिंदे गटानं गदा, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांपैकी कुठल्या एका चिन्हाची मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं असून शिंदे गटाला पुन्हा नव्यानं चिन्ह सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता शिंदे गटानं ढाल-तलवार, पिंपळाचं झाड आणि तळपता सूर्य ही तीन चिन्ह सादर केली आहे.

शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार?

निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाला धार्मिक चिन्ह किंवा प्रतिकांशी संबंधित चिन्ह राजकीय पक्षांना बहाल करता येत नाही. या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं याआधी निवडणूक आयोगाला सूचना केलेल्या आहेत. त्यामुळं आता निवडणूक आयोग शिंदे गटाला कोणतं चिन्ह देणार, याबाबत सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे चिन्ह का नाकारलं?

उगवता सूर्य हे चिन्ह द्रमूक पक्षाचं आहे. त्यामुळं हे चिन्ह दुसऱ्या कोणत्या पक्षाला देता येत नाही. त्यामुळं उगवता सूर्य हे चिन्ह आयोगानं ठाकरे किंवा शिंदे गटाला दिलेलं नाही. याशिवाय त्रिशूळ हे चिन्ह धर्माशी संबंधित असल्यानंही हे चिन्ह दोन्ही गटांना नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटानं सूचवलेल्या या तीन चिन्हांतून निवडणूक आयोग शिंदे गटाला कोणतं चिन्ह देणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

IPL_Entry_Point