मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgaon : कडू-राणांच्या वादानंतर शिंदे गटात धुसफूस; निधीवाटपावरून आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Jalgaon : कडू-राणांच्या वादानंतर शिंदे गटात धुसफूस; निधीवाटपावरून आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 27, 2022 11:41 AM IST

Shinde Group : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांमध्येही धुसपूस सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

eknath shinde
eknath shinde (HT)

Gulabrao Patil vs Chimanrao Patil : ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यासाची प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपचे सहयोगी आमदार रवि राणा यांनी केला आहे. त्यानंतर आठ दिवसांत आरोप सिद्ध करा नाही तर वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा कडूंनी भाजपला दिला आहे. रवि राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच आता शिंदे गटातील आमदारांमधील धुसफूस चव्हाट्यावर आला आहे. त्यातच आता जळगावात मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव यांच्यात धुसफूस झाल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या महितीनुसार, राष्ट्रवादीच्या विरोधक नेत्याला निधी दिल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांनी गुलाबराव पाटलांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे. त्यामुळं आता शिंदे गटातील अंतर्गत वाद आणि धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. याआधी मंत्री गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यात जाहीर व्यासपिठावर मतभेद पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वादानंतर शिंदे गटासह भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपचे सहयोगी आमदार रवि राणांनी केला आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे. रवि राणांनी येत्या आठ दिवसांत केलेले आरोप सिद्ध करावेत नाही तर वेगळा निर्णय घेऊ असं प्रत्युत्तर आमदार बच्चू कडूंनी दिलं आहे. त्यामुळं या आरोपांनंतर शिंदे गटातील आमदारांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

IPL_Entry_Point