मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ लिहिल्यानं नोटांवर त्यांचाच फोटो हवा; शिवसेनेची मागणी

बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ लिहिल्यानं नोटांवर त्यांचाच फोटो हवा; शिवसेनेची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 27, 2022 10:26 AM IST

Sushama Andhare : नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्यानं राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता या वादात शिवसेनेनं उडी घेतली आहे.

Sushama Andhare On Babasaheb Ambedkar
Sushama Andhare On Babasaheb Ambedkar (HT)

Sushama Andhare On Babasaheb Ambedkar : आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्यात यावेत, अशी मागणी केल्यानं देशात राजकीय वादंग पेटलं आहे. विरोधकांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली असून त्यातच आता शिवसेनेनंही या वादात उडी घेत चलनी नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा ग्रंथ लिहिला आहे. त्यांनी अर्थक्रांती आणि अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केलेला असल्यानं त्यांचाच फोटो नोटांवर छापण्यात यायला हवा, अशी मागणी अंधारेंनी केली आहे. केंद्रातील मोदी सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतला परंतु त्याची मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षांपूर्वी केली होती, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

देशात वैचारिक अधिष्ठान घडवणाऱ्या आणि ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या व्यक्तींचे फोटो चलनी नोटांवर असतात. परंतु ज्यांनी अर्थशास्त्राचा प्रचंड अभ्यास केला आहे, त्यांचाच फोटो नोटांवर छापण्यात यावा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चर्चेचं वादळ उठवण्यासाठीच हे वक्तव्य केल्याचंही अंधारे म्हणाल्या आहेत.

IPL_Entry_Point