मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fire Incident : मुंबईच्या गिरगावमध्ये भीषण अग्नितांडव, १४ वाहनं जळून खाक; कोट्यवधींचं नुकसान

Fire Incident : मुंबईच्या गिरगावमध्ये भीषण अग्नितांडव, १४ वाहनं जळून खाक; कोट्यवधींचं नुकसान

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 27, 2022 08:37 AM IST

Girgaon Fire Incident : मुंबईच्या गिरगावातील पुंगलिया हाऊसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यात तब्बल १४ वाहनं जळून खाक झाली आहे.

Girgaon Fire Incident
Girgaon Fire Incident (HT)

Girgaon Fire Incident : दिवाळीला फटाके फोडताना मुंबईतील अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबईतील गिरगावमध्ये पुंगलिया हाऊसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या भीषण आगीत तब्बल १४ वाहनं जळून खाक झाली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. परंतु कोट्यवधींच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गिरगावात नवाकाळ दैनिक कार्यालयाला खेटून असलेल्या पुंगलिया हाऊसला मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत कंपाऊंडमध्ये असलेल्या सहा कार जळून खाक झाल्या आहेत तर आठ ते दहा दुचाकीही भस्मसात झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री परिसरात काही लोकांनी फटाके वाजवल्यानं उडालेल्या ठिणग्यांमुळं ही आग लागल्याचं बोललं जात आहे.

पुंगलिया हाऊसमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की त्यात कंपाऊंडमधील कपडे, प्लास्टिक आणि नायलॉनचे रोल जळून खाक झाले आहेत. त्यानंतर परिसरात आग लागल्याची घटना समजता स्थानिक लोकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून यात कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

IPL_Entry_Point

विभाग